उमरी नगर पालिकेच्या नियोजन शुन्य कारभारामुळे इस्लापुर नगर भागातील अनेकांच्या घरात अतिवृष्टीच्या पावसाचे पाणी शिरले.
तात्काळ आर्थिक मदत करण्याची कवळे गुुुरुजींची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी.
उमरी, नांदेड –
काँग्रेस पक्षाचे नेते मारोतराव पाटील कवळे गुरुजी यांनी उमरी शहरातील इस्लामपुर भागात येऊन पाहणी केली असता येथील पावसाचे पाणी अनेकांच्या घरात शिरले यात मोठ्या प्रमाणात येथील कुटुंबियांचे नुकसान झाले. पालिकेच्या नियोजन शुन्य कारभारामुळे अनेकांचे संसार रस्त्यावर आले. याला सर्वस्वी जबाबदार नगरपालिका आहे. येथील कुटुंबियांना कवळे गुरूजी यांनी धीर देत अन्नधान्याचे किट यामद्धे तांदूळ, गहूपीठ, तेल, दाळ, मिरची, हळद साखरपती, मीठ व चादरी शेख शकील,सोनु वाघमारे,गजानन अडगुलवार, पी.जी.गिलचे,शेख हुसेनी यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
उमरीच्या इस्लामपुर भागात अनेकांच्या घरात अतिवृष्टीच्या पावसाचे पाणी येथील कुटूबीयांच्या घरात शिरल्यामुळे नुकसान झाले येथील परिस्थितीची माहिती मा.जिल्हाधिकारी,उपविभागीयअधिकारी यांना देण्यात आली. यावेळी तहसीलदार माधवराव बोथीकर व मुख्याधिकारी श्रीकांत काबंळे यांना सोबत घेऊन पाहणी केली व तात्काळ प्रशासनाने आर्थिक मदत येथील कुटुंबियांना करावी अशी विनंती कवळे गुरूजी, संजय कुलकर्णी, किशोर पबितवार, शेख शकील, यावर पटेल, गजानन अडगुलवार यांच्यासह असंख्य काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली.