उमरी येथील डॉ.आंबेडकर नगर येथे 65 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा.
उमरी, नांदेड –
उमरी येथील डॉ.आंबेडकर नगर येथे 65 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सर्वप्रथम विश्ववंदनीय महाकारूणीक तथागत गौतम बुद्ध, परम पूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व पंचशील ध्वजारोहण आंबेडकर नगर येथील ज्येष्ठ न.पा. सेवानिवृत्त कर्मचारी शंकरराव मदने यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर सामूहिकरित्या त्रिसरण पंचशील गाथेचे पठण करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजक पत्रकार संरक्षण समितीचे जिल्हा कार्यकारणी सदस्य तथा पत्रकार कैलास सोनकांबळे यांनी केले होते तर यावेळी गर्जना युवा मंचचे पदाधिकारी संदीप सवई, मनोज सोनकांबळे, श्रीधर सवई, चंद्रप्रकाश पवार,रवी सोनकांबळे, रतन खंदारे, कपिल सवई, मिलिंद सवई, निखिल सोनकांबळे, तरुण वाघमारे, दीपक सवई, अजय गायकवाड, सिद्धार्थ वाघमारे, शुभम सोनकांबळे, संतोष गायकवाड, विशाल सवई, बाळू लांडगे, संतोष सवई, निळकंठ चौदंते आदी समाजबांधवांची उपस्थिती होती.