उमरी येथे सिध्दार्थ गौतम बुद्ध, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापणा व बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथाची सांगता समारोहपर कार्यक्रमाचे आयोजन.

388

प्रकाश कारलेकर

उमरी, नांदेड –

उमरी शहरातील काश्यप बुद्ध विहार येथील तीन महिन्यापासून भारतीय बौद्ध महासभाच्या वतीने बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथाची सांगताचे आयोजन भारतीय बौद्ध महासभेचे उमरी तालुका अध्यक्ष भीमराव वाघमारे व काश्यप बुद्ध विहार नगरीतील सर्व बौद्ध उपासकांच्या सहकार्याने हा तृतीय मास महिन्याचे बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथाची सांगता अत्यंत चांगल्या पद्धतीने पार पाडली.गौतम बुद्ध यांच्या विचारांचे दररोज रात्री बुद्धांच्या विचाराचे वाचक केले आहे. हा कार्यक्रम भारतीय बौध्द महासभा शाखेच्या वतीने शहरात सर्वप्रथम बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथाची सांगता लावण्यात आली होती. त्यामुळे काश्यप नगरीतील सर्व बौद्ध उपासक, महिलांचे अत्यंत तळमळीने त्यांचे योगदान लाभले असून त्या निमित्ताने दिनांक 08 ऑक्टोबर 2021 रोजी सिद्धार्थ गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीचे प्रतिष्ठात्मक व बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथाची सांगता समारोहपर कार्यक्रम आयोजित केला आहे तरी या कार्यक्रमाचे आयोजन, भारतीय बौद्ध महासभा उमरी च्या वतीने करण्यात आले.

दिनांक 08 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी पंचरंगी ध्वजाचे ध्वजारोहण सकाळी ठीक 10 वाजता भारतीय बौद्ध महासभा शहराध्यक्ष शेशाबाई खंदारे यांच्या हस्ते होईल त्यानंतर सिद्धार्थ गौतम बुद्ध यांच्या मूर्तीचे प्रतिष्ठापणा उपा.वच्‍छलाबाई विठ्ठलराव सवई यांच्या हस्ते करण्यात येईल.पूजापाठ धर्मगुरू पूज्य भंतेजी गुणरत्न महाथेरो औरंगाबाद यांच्या हस्ते करण्यात येईल त्यानंतर बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथाची सांगताचे सूचक सतीश शेषराव झडते तालुका कोषाध्यक्ष प बोधाचार्य अशोक खंदेलोटे वाचक कुमारी, दीक्षिता भिमराव वाघमारे यांनी अत्यंत तळमळीने बुद्धांचे विचार सांगितले. त्यानंतर पुढील कार्यक्रम स्वागताध्यक्ष संजीव विठ्ठलराव सवई (शासकीय गुत्तेदार) कार्यक्रमाचे अध्यक्ष भीमराव वाघमारे कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे डॉक्टर यशवंत चावरे साहेब, जिल्हाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा तथा सेवानिवृत्त न्यायमूर्ती, रविकिरण जांभळे सर सा ना भालेराव सर प्राध्यापक ए.एस.जाधव सर जिल्हाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा नांदेड कार्यक्रमाला आदी जणांची उपस्थिती लाभणार आहे. त्यानंतर दुपारी दोन ते पाच वाजेपर्यंत भोजनदानाचा कार्यक्रम संपन्न होईल, बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथाची सांगता व धम्मदेसना सायंकाळी पाच वाजता भंते गुणरत्न महाथेरो औरंगाबाद हस्ते करण्यात येईल त्यानंतर 08 ऑक्टोबर शुक्रवार रात्री ऑर्केस्ट्रा विकास जोंधळे प्रस्तुत स्वरबहार पौर्णिमा कांबळे यांचा बुद्ध भीम गीतांचा नजराना पर कार्यक्रम करण्यात येईल तरी या कार्यक्रमाचा सर्व जनतेने आवश्य लाभ घ्यावा असे अहवाल भारतीय बौद्ध महासभा उमरी शाखेच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.