महाराष्ट्र राज्याच्या आदेशानुसार नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत उमरी पंचायत समिती गट साधन केंद्राच्या वतीने गटशिक्षणाधिकारी पी.एन.कदम यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या उमरी परिसरातील ऊसतोड स्थलांतरीत वस्तीतील २३ मजूरांना लसीकरणाचे डोस देण्यात आले.
रविवारी ५ डिसेंबर २०२१ रोजी उमरा, तालुका लोहा, जिल्हा नांदेड तसेच खळी तांडा, तालुका गंगाखेड, जिल्हा परभणी येथून ऊसतोडीसाठी कै.बाबासाहेब देशमुख गोरठेकर समाधी स्थळ गोरठा परीसर या ठिकाणी वस्ती करून राहत असलेल्या वस्तीला शंकरराव बेळकोणे केंद्र प्रमुख केंद्र-तळेगाव व गटशिक्षणाधिकारी कार्यालयातील विषय साधन व्यक्ती नंदेश्वर पी. ए.यांनी भेट देऊन लसीकरण विषयी जनजागृती केली व लसीकरण करून घेण्यासाठी प्रेरीत केले. त्यानंतर तालुका आरोग्य केंद्र उमरी येथील डॉ.नारायण कस्तुरे वैद्यकीय अधिकारी यांची भेट घेऊन चर्चा केली व वस्तीत लसीकरण कॅम्प लावण्यासाठी विनंती करण्यात आली.या विनंतीला लगेचच होकार देत डॉ.नारायण कस्तुरे वैद्यकीय अधिकारी, सिंधी यांनी आपल्या तालुका आरोग्य केंद्रातील कर्मचारी श्रीमती आदगुलवार एस, एस. सुपरवायझर, यामेवार एस. एस.आरोग्य सेविका व प्रशांत गोविंद गजभोर आरोग्य सेवक आदी कर्मचाऱ्यांनी लसीकरण यशस्वीरीत्या पार पाडले.
लसीकरण मध्ये दोन्ही टोळी मधील २३ मजूरांनी लस टोचून घेतली.या लसीकरण प्रसंगी अब्दुल्लापुरवाडी येथील शिक्षक विनायक होनशेट्टे, पत्रकार बापुराव रिठेकर, दैनिक गोदातीर समाचार व नागठाणा बु.येथील शिक्षक देवीदास गोडगे यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.