ऊस तोड कामगाराला अश्लील शिव्या व पट्टयाने मारहाण केल्याप्रकरणी ॲट्रासिटीचा गुन्हा दाखल.

कुंटुरच्या कारखान्यात रात्रभर ठेवले डांबून.

785
नायगाव, नांदेड –
नायगाव तालुक्यातील कुंटूर परिसरातील मौजे बळेगाव येथील शेतकर्‍यांनी ऊसतोड कामगाराच्या मुलाला मारहाण केली व त्याला जातीवाचक शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी कुंटुर  पोलिस ठाण्यांमध्ये तीन जणांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तिन्ही आरोपीना तात्काळ अटक करून नायगाव कोर्टात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी दिल्याची माहिती सपोनि महादेव पुरी यांनी दिली.  
फिर्यादी बुद्धभूषण रवींद्र जाधव वय वर्ष 26, राहणार सुयाजातपुर शहापूर, तालुका देगलूर येथील रहिवासी असून त्याच्या वडिलांनी बळेगाव येथील शेतकऱ्यांचे पंचवीस हजार रुपये ऊस तोडणीसाठी घेतले होते. वडील गावाला निघून गेले त्यामुळे बळेगाव येथील आरोपी शेषराव बेलकर, बळवंत मोरे, संतोष बेलकर यांनी माझ्या घरी येऊन शहापूर येथे येऊन फिर्यादीला नेले तुझ्या वडिलांना पैसे नेले तुझे वडील कुठे गेलेत वडील नाहीत तू आमच्या इथे काम कर असे म्हणून जबरदस्ती बळेगाव येथे आणले त्यामुळे मी इथे आलो. शनिवार रोजी संध्याकाळी नऊ वाजता मला कुंटुर येथे आणून शेतामध्ये मारहाण केले व मला मारून टाकतो अशी धमकी देत शिवीगाळ करून  मारहाण केली व पोलीस स्टेशनला येण्यासाठीही मला अडवून कुंटुर कारखाना येथे एक दिवस डांबून ठेवले असा आरोप फिर्यादीने केला आहे. 
बुद्धभूषणने मला मारू नका, अशी विनंती केली असताना बळवंत मोरे यांनी त्यांच्या जवळच्या कमरेच्या बेल्टने खूप मारले आणि जखमी केले. संतोष बेलकर यांनी पण खुप लाथा बुक्क्यांनी मारहाण केली व संतोष यांनी जातीवाचक शिवीगाळ केली.दि.21 रोजी पोलीस स्टेशन येथे तक्रार देण्यात येत असताना मला शेतातून बाहेर जाऊ दिले नाही. पोलिसात तक्रार केली असता तुला खतम करतो म्हणाले अशी जीवे मारण्याची धमकी दिली. सदर माहिती प्रकरणी कुंटुर पोलीसांनी तीन आरोपींना ताब्यात घेऊन कोर्टात हजर केले आहे. पुढील तपास दिनेश येवले, पोउपनिरीक्षक कुंटुर करित आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.