“एनसीइआरटी”च्या शिक्षण धोरणांच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्नरत प्राचार्य रमिंदरकौर मोदी सन्मानित.

दिल्ली येथे झाला सत्कार.!

347

नांदेड –

केंद्र शासनातर्फे वर्ष 2020 मध्ये अंमलात आणलेल्या नवीन शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणी आणि प्रचार – प्रसार योजनेत उल्लेखनीय असे योगदान दिल्यामुळे स्कूल ऑफ़ स्कॉलर्स (हिंगणघाट) येथे कार्यरत प्राचार्या सौ. रमिंदरकौर मोदी यांचे दिल्ली येथे एनसीइआरटी, एडजू टॉक आणि रिषिहुड विद्यापीठाच्या संयुक्त कार्यक्रमात स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आले.

दिल्ली येथील एनसीइआरटी परिसरात दि. 11 सप्टेंबर 2021 रोजी आयोजित या कार्यक्रमात एनसीइआरटीचे सचिव मेजर हर्षकुमार,वॉइस ऑफ चॉइस वेबिनार उपक्रमाचे संचालक शिक्षाविद मोहन प्रदीप शर्मा, एड्जू टॉकच्या प्रमुख श्रीमती शशि पांडे यांच्या प्रमुख उपस्थित हा सत्कार करण्यात आला. या वेळी देशपातळीवर केंद्र शासनाच्या नवीन शिक्षण धोरणांच्या अंमलबजावणीसाठी वेबिनार, सेमिनार आणि लेखन इत्यादीच्या माध्यमातून योगदान देणाऱ्या प्राचार्य – प्राचार्या व शिक्षण प्रसारक व्यक्तीमत्वांचे सत्कार करण्यात आले. महाराष्ट्रातून सौ. रमिंदरकौर मोदी (नांदेड) यांना हा सन्मान प्राप्त झाले आहे. वर्ष 2020 मध्ये पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी 35 वर्षानंतर देशाच्या शिक्षण धोरणात संशोधन व परिवर्तन घडवून आणले. पण याच दरम्यान कोविड संक्रमणामुळे देशातील असंख्य शिक्षण संस्था बंदावस्थेत होत्या. त्यामुळे नवीन शिक्षण कायदा व धोरण अंमलबजावणीत 90 टक्के शिक्षण संस्था अपयशी ठरल्या. अशावेळी एनसीइआरटीच्या प्रोत्साहन  व प्रसार कार्यात एड्जू टॉकच्या श्रीमती शशि पांडे आणि श्री मोहन प्रदीप शर्मा यांनी वेबिनारच्या माध्यमातून नवीन शिक्षण धोरण अंमलबजावणी चळवळ सुरु केली. यात सौ. रमिंदरकौर मोदी यांनी वेळोवेळी नवीन मुद्दे, सूचना आणि सुधार यावर भर देणारे कार्ये केलेत. सुरुवातीला आपल्या शाळेत नवीन शिक्षण धोरणांची अंमलबजावणी केल्यानंतर इतर शाळांच्या व्यवस्थापनासोबत समन्वय साधून या विषयीच्या अंमलबजावणीसाठी प्रोत्साहन व मदत केली.

केंद्र शासनाच्या उपक्रमास समर्पितपणे मदत केल्याच्या त्यांच्या कार्याची पावती म्हणून त्यांचे एनसीइआरटी तर्फे सत्कार करण्यात आले. सौ. रमिंदरकौर मोदी यांच्या यशाचे मेघे ग्रुप ऑफ स्कूल्सच्या ‘स्कूल ऑफ स्कॉलरच्या’ संचालिका सौ. देविका मेघे, सौ.आभा मेघे, श्री आजिंक्य अम्बरखाने, शाळेचे सर्व शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे. महाराष्ट्रात नवीन शिक्षण धोरणांची शंभर टक्के अंमलबजावणी होण्यासाठी सर्व शिक्षण संस्थांनी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे एनसीइआरटीचे सचिव मेजर श्री हर्षकुमार यांच्या तर्फे कार्यक्रमात अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.