एमपीएससी मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत गजानन पवार यांची वन परीक्षेत्र अधिकारी (RFO)पदी निवड.

254

ए.जी.कुरेशी

बिलोली, नांदेड –

बिलोली तालुक्यातील मौजे खतगाव या ग्रामीण भागातील सर्व सामान्य शेतकरी कुटुंबातील विद्यार्थी गजानन गोविंद पवार यांनी प्रचंड इच्छा, शक्ती, जिद्द, चिकाटी आणि मेहनतीने लोकसेवा आयोगा ( MPSC) मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये वन परीक्षेत्र अधिकारी (RFO) म्हणून यश मिळविले. वन परिक्षेत्र अधिकारी म्हणून निवड झाल्यामुळे त्याचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे. या यशाचे श्रेय गजाननने त्याचे आई-वडील, काका- काकी, भाऊ-बहीण व नातेवाईकांना दिले.आजच्या तरुण पिढीला व सर्व स्पर्धा करणाऱ्या विद्यार्थ्यांना हे यश नक्कीच प्रेरणा घेण्यासारखे आहे.गजाननचे पहिली ते दहावीचे शिक्षण मंजुळाबाई हायस्कूल खतगाव ता. बिलोली या गावी झाले असून पुढील शिक्षण अकरावी ते बारावी यशवंत महाविद्यालय नांदेड व इंजीनियरिंग के.आय.टी. कॉलेज कोल्हापूर येथे झाले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.