”ओजस” मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी तसेच रक्तदान शिबीर.

373
नांदेड –
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कालकथित ज्ञानोबा जळबाजी औराळकर यांच्या सातव्या स्मृतीदिनानिमित्त नांदेडच्या हडको परिसरातील ओजस मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीने ८ डिसेंबर रोजी ‘मोफत’ आरोग्य तपासणी शिबीर आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कालकथित ज्ञानोबा औराळकर यांच्या सातव्या स्मृतीदिनानिमित्त बुधवार दि. ८ डिसेंबर रोजी नांदेडच्या ‘हडको’ परिसरातील ‘ओजस’ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात येत आहे.
‘ओजस’ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीने आयोजित ‘मोफत’ आरोग्य तपासणी शिबिरात अतिदक्षता विभाग तथा भुलतज्ञ डॉ.भास्कर औराळकर, हृदयरोग व मधुमेह तज्ञ डॉ.प्रदिप मुगटकर, स्त्री रोग तथा प्रसुतीशास्त्र तज्ञ डॉ. नेहा देशपांडे, जनरल सर्जन तसेच प्रसिद्ध पोटविकार तज्ञ डॉ.विशाल पानशेवडीकर, त्वचा रोग, केशविकार व सौंदर्य तज्ञ डॉ.बालाजी जाधव, जनरल सर्जन, मुळव्याध व भगंदर तज्ञ डॉ.वसंत पांचाळ, पंचकर्म तज्ञ डॉ.कल्पना औराळकर तसेच प्रसिद्ध नवजात शिशु व बालरोग तज्ञ डॉ. राहुल कांबळे हे सर्व रूग्णांची मोफत आरोग्य तपासणी करून औषधोपचार करणार आहेत. दरम्यान, रूग्णांना मोफत औषधी वाटप करण्यात येणार आहे.
या मोफत शिबिराचा सिडको- हडकोसह नवीन नांदेड भागातील बळीरामपूर, धनेगाव, गोपाळचावडी, तुप्पा, काकांडी, बाभुळगाव, गुंडेगाव, असदवन व वाघाळा परिसरातील स्त्री आणि पुरुष रूग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन शिबिराचे मुख्य आयोजक डॉ.भास्कर औराळकर व डॉ.कल्पना औराळकर यांच्यासह त्यांच्या सर्व सहकारी डॉक्टरांनी केले आहे. याशिवाय, अपघातात गंभीर जखमी झालेल्या अनेक जखमी व्यक्ती व गोरगरीब तथा गरजू रूग्णांचे प्राण वाचवण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात नवीन नांदेडातील बहुसंख्य तरूण दात्यांनी रक्तदान करून सहकार्य करावे, असे नम्र आवाहन शिबिराचे मुख्य आयोजक डॉ.भास्कर औराळकर, डॉ. कल्पना औराळकर, शांताबाई औराळकर, प्रविण औराळकर तसेच त्यांच्या सर्व सहकारी डॉक्टर मंडळींसह अधिपरिचारीका आणि सहकारी-आरोग्य कर्मचाऱ्यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.