औरंगाबादेत कुख्यात गुंडाची हत्या
शहरात खुनाचे सत्र सुरूच आहे. नुकतेच शहागंज भागातील एका कुख्यात गुंडाची पैशाच्या वादातून हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे.
● जमीर शब्बीर खान असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार जमीरच्या नातेवाईकाने पैशाच्या वादातून जमिरचा खून केला आहे.
● याप्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले असून, त्याची कसून चौकशी सुरू आहे.
● औरंगाबाद शहरात जमीरची कुख्यात गुंड म्हणून दहशत होती. त्याच्या नावावर पोलीस ठाण्यात अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.
● साडूसोबत झालेल्या पैशाच्या वादातून त्याची हत्या झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.