कंधार येथील अपघातात जखमी झालेल्या रुग्णांची पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी घेतली भेट.

619

नांदेड-
कंधार येथील महाराणा प्रताप चौकात टेम्पो गाडीचा ब्रेक निकामी होवून झालेल्या भीषण अपघातातील ६ जखमी रुग्णांची पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी प्रत्यक्ष भेटून चौकशी केली. जखमींना तातडीने डॉ.शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात आणल्याचे वृत्त कळताच पालकमंत्री अशोक चव्हाण तातडीने रूग्णालयात दाखल झाले.त्यांनी जखमींची आस्थेवाईकपणे विचारपूस केली व त्यांच्या प्रकृतीविषयी डॉक्टरांशी विचारविनिमय केला. दुर्दैवाने या अपघातात 2 ठार तर 16 जण जखमी झाले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.