किनवट- माहूर तालुक्यातील प्रलंबित समस्याच्या निवारणार्थ आढावा बैठक घ्या.

प्राचार्य राजेंद्र केशवे यांचे पालकमंत्री ना.अशोकराव चव्हाण यांना साकडे.

345

जयकुमार अडकीने

माहूर, नांदेड –

किनवट, माहूर तालुक्यातील असंख्य कामे प्रलंबित असल्याने सदर प्रलंबित कामाचा आढावा घेऊन प्रलंबित कामे मार्गी लावण्यात यावी, अशी मागणी नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक तथा माजी नगराध्यक्ष विद्यमान नगरसेवक प्राचार्य राजेंद्र केशवे यांनी माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान पालकमंत्री ना.अशोकराव चव्हाण यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

सादर केलेल्या निवेदनात अतिवृष्टीने झालेले शेतीचे व पुलाचे नुकसान, दोन्ही तालुक्यात वर्षानुवर्षे न झालेले पांदण रस्ते, दोन्ही तालुक्यातील निराधारांना न मिळालेले मानधन, तीर्थक्षेत्र विकासाची प्रलंबित कामे, शिखर ते अनुसया माता मंदिर रस्ता दत्तशिखर अनुसयामाता मंदिर परिसर विकास मागील पाच वर्षापासून अल्पसंख्यांक विकास निधी माहूर न.प.ला न मिळल्याने त्याबाबत प्रलंबित कामे, दोन्ही तालुक्यातील अनेक गावांना स्मशानभूमी जागा व शेड नसल्याने प्रलंबित कामे,तीर्थक्षेत्र विकास प्राधिकरणाची बांधलेली माहूर येथील इमारत (टी.एफ.सी.सेंटर) उदघाटना बाबत, माहूर क्रीडा संकुलाचा प्रलंबित प्रश्न, दोन्ही तालुक्यातील माध्यमिक शाळा/कॉलेजला जोडणारे रस्ते, पुल इत्यादी बाबतीत आढावा घेऊन माहूर तालुक्याचा मानव विकास योजनेमध्ये समावेश करण्यात यावा आदी मागण्याचा समावेश आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.