कुष्णूरच्या कीर्ती गोल्ड मध्ये लाकूड खरेदी, परिणामी नायगावसह इतर तालुके वृक्ष तोडीने झाले ओसाड.

559
नायगाव, नांदेड –

नायगाव तालुक्यात वृक्षांची मोठ्या प्रमाणात तोड होत असल्यामुळे नायगाव तालुक्यातील कुष्णूर औद्योगिक वसाहतीत कार्यान्वित असलेली कीर्ती गोल्ड कंपनी ही गेल्या अनेक वषार्पासून प्रशासनाच्या व वनपरीक्षेत्र अधिकाऱ्याच्या डोळ्यात धूळ फेकून व आर्थिक तडजोडीने मोठ्या प्रमाणात लाकूड खरेदी करत असल्यामुळे ग्रामीण भागातील अतिशय मौल्यवान वृक्षांची तोड़ होत असल्याचे दिसून येत आहे.असे असताना ही उपवनसंरक्षण वन विभाग नांदेड यांनी दुर्लक्ष केल्याने कीर्ती गोल्ड कंपनीने लाकूड खरेदीचा सपाटा चालू केला आहे.

तालुक्यातील कीर्ती गोल्ड कंपनीने गेल्या अनेक दिवसांपासून लाकूड खरेदी करण्याचा सपाटा लावला आहे. कंपनीने खरेदी करून साठा करून ठेवलेल्या लाकडाची तात्काळ चौकशी करून त्यांच्यावर कार्यवाही होणे गरजेचे असल्यामुळे ग्रामीण भागात वृक्ष लागवडीच्या ऐवजी वृक्ष तोड होऊन प्रचंड नुकसान होत आहे.एकीकडे झाडे लावा झाडे जगवा शासन प्रचार करीत असल्याने झाडे लावण्याच्या नावाखाली भरपूर खर्च करीत आहे. तर मोठ्या प्रमाणात अवैधरित्या लाकूड खरेदी करणाऱ्या किर्ती गोल्ड कंपनीवर कारवाई करावी अशी मागणी ग्रामीण भागातील जनतेतून होत आहे.

नायगाव तालुक्यात वाळवंटाचे स्वरूप दिसून येत असून वृक्ष तोड जनतेनी केली असली तरी वृक्ष तोडीचा धंदा करणाऱ्या लाकूडतोड्या कडून मशनरीद्वारे तोडणे व ट्रॅक्टरद्वारे पोहोच करणे हा दररोजचा धंदा बनला आहे. सदरच्या लाकूडतोडी साठी अनेक टोळ्या सक्रिय झाल्या असून वृक्ष तोड़ मोठया प्रमाणात होत असल्याने वनपरिक्षेत्राधिकारी हे उघड्या डोळ्याने हा प्रकार पाहत आहेत.

कुष्णूरच्या एमआयडीसी बिलोली, धर्माबाद, उमरीसह नायगाव, देगलूर, मुखेड तालुक्यासाठी औद्योगिक क्षेत्रात नावाजलेली व जिल्ह्यात प्रसिद्ध असल्यामुळे  उद्योग सुद्धा जोरदार चालतो. कीर्ती गोल्ड कंपनी ही खाद्य तेल तयार करते यासाठी तिला लाकूड खरेदी करणे भाग आहे. असे असल्यामुळे नायगाव तालुक्यातील वृक्षांची चांगलीच विल्हेवाट लागली असून वनविभाच्या अधिकाऱ्यांनी या कंपनी विरुद्ध कारवाई करावी अशी अपेक्षा सर्वसामान्यांची आहे. येथील कंपनीच्या कारभाराची चौकशी करून पंचनामा करावा व सदरच्या कंपनीवर कारवाई करावी अशी मागणी वनप्रेमी नागरिकासह जनतेनी केली असून खरे तर कीर्ती गोल्ड कंपनी प्रशासनाच्या डोळ्यात धूळ टाकून लाकूड खरेदी करत असल्याने ग्रामीण भागातील वृक्षांची चांगलीच विल्हेवाट लागली असल्यामुळे कंपनीवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जोर धरीत आहे.

एखाद्या भांडवलदारांची कंपनी वेगाने चालावी म्हणून वेगवेगळ्या वृक्षांची कत्तल होऊन संपूर्ण नायगाव मतदारसंघ वाळवंट झाले तर भविष्यात फार मोठ्या गंभीर प्रश्नाला तोंड द्यावे लागेल, तेव्हा वरिष्ठांनी वेळीच आपल्या अधिकाराप्रमाणे निर्णय घेऊन वृक्षांची कत्तल तोड थांबवावी व सदर कंपनीवर कारवाई करावी, अशी मागणी अनुभवी नागरिक करीत असल्याचे दिसून येते.कृष्णूर येथील कोर्ती गोल्ड कंपनीने मोठ्या प्रमाणात लाकूड खरेदी करत असताना नांदेडचे उपवनसंरक्षक अधिकाऱ्याने कीर्ती गोल्ड कंपनीकडे जाणून बुजून लक्ष देत नाही.

वृत्त समजताच धाड टाकली; कीर्ती गोल्ड मध्ये लाकूड आढळले नाही.
-फिरते पथक प्रमुख पोतुलवार.

या विषयी संपर्क केला असता फिरते प्रमुख पोतुलवार यांना संपर्क केला असता दि.22 नोव्हेंबर रोजी वृत्त समजताच धाड टाकली पण कीर्ती गोल्ड च्या कंपनीच्या एरिया मध्ये कुठेही लाकूड आढळले नाही. त्यामुळे कार्यवाही करता आली नाही असे सांगितले.नायगाव तालुक्याचे वनपाल गुरुपवार यांना ही विचारले असता त्यांनी या घटनेला दुजोरा दिला व दुसरीकडे नायगाव स्थानिक पथकाने खानावळीच्या ठिकाणी अर्धे ट्रकटर लाकूड पकडून कार्यवाही केल्याचे सांगितले.कीर्ती गोल्डला लाकूड वापरासाठी परवानगी नसून नांदेडहून पास असलेला माल ते आणतात नंतर या भागातील लाकूड खरेदी केल्यास कार्यवाही अटळ असे बोलताना सांगितले.

कीर्ती गोल्ड मधील धाड सुनियोजित कंपनीने लाकूड इतरत्र हलवले.

वर्तमान पत्रातील बातमी वरून नांदेडचे फिरते पथक प्रमुख पोतुलवार व त्यांच्या टीमने कीर्ती गोल्ड मध्ये टाकलेली धाड नियोजित असल्याने पथक येणार या भीतीने कंपनीत असलेले लाकूड इतरत्र हलवले अशी चर्चा आहे.पथकाला धाड टाकायचीच होती तर मग धाड गडगा येथे का टाकली नाही शिवाय राहेर,नरसी नायगाव नरसी, कुंटुर सर्कल मध्ये का धाडी नाहीत, हा प्रश्न असून वनविभागाच्या कर्मचाऱ्यातील मतभेद व एकमेकांच्या तक्रारी करून काही प्रकरणे झाकून तर काहींची प्रकरण उकलून त्यांना त्रास देण्याचा प्रकार असल्याचे चित्र दिसून येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.