कोरोना संबधी प्रशासनाच्या निर्देशाचे पालन करून सण उत्सव साजरे करावे – प्रदीप जमदाडे.
पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना व स.पो.नि.शिवप्रकाश मुळे स्मरणातील पोलीस अधिकारी.
जयकुमार अडकीने
माहूर, नांदेड-
चंद्रकिशोर मीना सारखे पोलीस अधीक्षक व शिवप्रकाश मुळे यांचे पोलीस प्रशासन लक्षात राहण्यासारखे असल्याचे प्रतिपादन गुंडवळ तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष प्रदीप जमदाडे यांनी गणेशोत्सवच्या निमित्ताने शांतता समितीच्या बैठकीत केले. यावेळी गावातील धर्मा राठोड, उत्तम राठोड, नथ्थू पाईकराव, वसंता किसन कांबळे, वंसता वाघू कांबळे, बुधाजी कोल्हे आदिसह गावकरी उपस्थित होते. पुढे बोलतांना जमदाडे म्हणाले की तत्कालीन पोलीस अधीक्षक व स.पो.नि. यांचे स्मरण होणे म्हणजे विद्यमान पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे व स्थानिक पोलीस प्रशासनाचे काम चांगले नाही असा अर्थ मुळीच नसून विद्यमान पोलीस अधीक्षक व स्थनिक प्रभारी हे सुद्धा जिल्ह्याची व तालुक्याची कायदा सुव्यवस्था आपल्या स्टाईलने उत्तम प्रकारे सांभाळत आहेत. पोलीस प्रशासन सज्जनाच्या सदैव पाठीशी असून दुर्जनासाठी कर्दनकाळ ठरत असल्याने योग्य प्रकारे प्रशासन राबवीत असल्याने जनतेने सदैव पोलीस प्रशासनास सहकार्य केले पाहिजे. विशेष म्हणजे सध्या कोरोना कालावधी असल्याने सार्वजनिक सण व उत्सवाबाबत प्रशासनाचे जे काही निर्देश असतील ते तंतोतंत पालन करून आपण पोलीस प्रशासनास सहकार्य करूया, असे ते म्हणाले.
नांदेड जिल्ह्यात एकेकाळी पोलीस अधीक्षक म्हणून जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्था चांगल्या प्रकारे संभाळून अवैध व्यवसायिक व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना पोलिसी खाक्या दाखविलेले तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक तथा अमरावतीचे विद्यमान विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी जिल्ह्यात दबदबा निर्माण केला होता. तद्वतच माहूर पोलीस ठाण्यात सहायक पोलीस निरीक्षक म्हणून जानेवारी २०१७ पासून एक वर्ष कर्तव्य बजावलेले सहायक पोलीस निरीक्षक शिवप्रकाश मुळे यांनी माहूर शहर व तालुक्यात पोलीस दलाबाबत आदरयुक्त भीती निर्माण केली होती. मुळे यांनी त्यांच्या काळात माहूर तालुक्यातील अनेक अवैध व्यवसायिकांना चाप लावला होता. त्या कालावधीत त्यांनी अनेक मटका जुगार अड्डे, हातभट्टी दारूच्या अवैध व्यवसायांच्या अड्ड्यावर धाडी टाकून तालुक्यातील व शहरातील चोऱ्या दरोडे यांना आळा घातला होता. त्यामुळे कठोर प्रशासक असलेले तत्कालीन पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी त्यांना जिल्ह्याच्या विशेष पथकाचे प्रमुख नेमले. त्यानंतर त्यांनी जिल्हाभर अवैध व्यवसायाला आळा घालण्याची मोहीम राबवित जिल्ह्यातून गुन्हेगारीला हद्दपार करण्यात यश मिळविले होते. पोलीस प्रशासनाच्या “सदरक्षणाय,खलनिग्रहनाय” या ब्रीद वाक्याला साजेशी कामगिरी केली.
त्यांच्या या कामगिरीने जिल्ह्यात ते एक दबंग पोलीस अधिकारी म्हणून ओळखले जाऊ लागले. प्रशासकीय व्यवस्थापनाच्या नियमाने मार्च २०१९ मध्ये त्यांना नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील उस्माननगर पोलीस ठाण्यात प्रमुख ठाणेदार म्हणून नियुक्ती मिळाली. तेथेही त्यांनी आपला “सदरक्षणाय,खलनिग्रहनाय” कायम राखत वेगळी छाप निर्माण केली. जिल्ह्यामध्ये चंद्रकिशोर मीना सारखे पोलीस अधीक्षक व शिवप्रकाश मुळे सारख्या पोलीस अधिकाऱ्याची ते बदली होऊन गेल्यानंतर सुद्धा अनेक वर्षांनी त्यांच्या कारकिर्दीची आठवण होणे ही विशेष बाब होय.