कोल्हापूर येथे शिक्षक सुनिल धोबे राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित.

574

सखाराम क्षीरसागर
अर्धापूर, नांदेड –

‘आनंदगंगा फाऊंडेशन कोल्हापूर’ द्वारा सन २०२१ चे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ४० व्यक्तींना राष्ट्र व राज्यस्तरीय पुरस्कारांचे वितरण संजय घोडावत विद्यापीठ,अतिग्रे कोल्हापूर येथे खा.धैर्यशील संभाजीराव  माने व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.आनंदगंगा फाऊंडेशन द्वारा आदर्श शिक्षक,आदर्श सरपंच,आदर्श सामाजिक कार्यकर्ते,आदर्श व्यावसायिक अशा अनेक क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले .

पुरस्कार वितरण सोहळा दि.१८ सप्टेंबर २०२१ रोजी कोल्हापूर येथे पार पडला. राज्यस्तरीय पुरस्कार एकुण सात शिक्षकांना प्रदान करण्यात आले त्यात नांदेड जिल्ह्यातून सुनिल धोबे सहशिक्षक प्रा. शाळा देशमुख वाडी ता.अर्धापूर यांना दुर्गम भागात शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात आला.सुनिल धोबे यांनी २१ वर्षाच्या आपल्या सेवेत विद्यार्थी गुणवत्ता वाढविण्यासाठी अनेक उपक्रम राबविले. विद्यार्थ्यांना निसर्गातून शिक्षण देणे तथा शाळा डिजिटल करणे, शैक्षणिक सहलींचे आयोजन करणे अशा अनेक उपक्रमांद्वारे ते विद्यार्थी गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्नशील असतात .

आनंदगंगा फाऊंडेशन संस्था देशपातळीवर कार्य करते.या संस्थेचे संस्थापक तानाजी पवार हे कोल्हापूर जिल्हा परिषदेचे स्विकृत सदस्य आहेत. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मा. खासदार धैर्यशील माने, विनायक भोसले विश्वस्त संजय घोडावत विद्यापीठ,राजाराम वरुटे राज्याध्यक्ष महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ,किरण लोहार शिक्षणाधिकारी जि.प. कोल्हापूर, स्मिता डिग्रजे चेअरमन जिल्हा पतसंस्था कोल्हापूर व अन्य मान्यवर उपस्थित होते.
सुनिल धोबे यांना खा.धैर्यशील संभाजीराव माने यांच्या हस्ते शाल,मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.सुनिल धोबे यांनी लेखन केलेल्या राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाद्वारे प्रकाशित किशोर मासिक व जीवन शिक्षण मासिकातील लेखनाचा गौरव या ठिकाणी करण्यात आला .

Leave A Reply

Your email address will not be published.