गुन्हा दाखल करायचाच असेल तर माझ्यावर करा ! -खा.छत्रपती संभाजीराजे.
सामान्य गरीब मराठा बांधवांवर गुन्हा का?
नांदेड-
मराठा समाजाच्या आरक्षण व इतर मागण्यांसाठी काल 20 ऑगस्ट रोजी नांदेड येथे आयोजित करण्यात आलेल्या मूक मोर्चासाठी एकत्र आलेल्या मराठा बांधवांवर प्रशासनाने कोविडचे कारण दाखवत गुन्हे दाखल केले आहेत. राजकीय पक्षांना वेगळा न्याय आणि मराठा समाजाला वेगळा न्याय,असे का ? अशा शब्दांत छत्रपती संभाजीराजे यांनी ट्वीट केलं आहे.
नांदेड मराठा क्रांती मुक आंदोलकांच्या पाठीशी छत्रपती संभाजीराजे हे ठामपणे उभे राहिले असून काल दिनांक २० ऑगस्ट २०२१ रोजी मराठा क्रांती मुक आंदोलन नांदेड येथे छत्रपती संभाजीराजे यांच्या प्रमुख उपस्थिती पार पडले. यावेळी मराठा समाजाने खदखद दाखविण्यासाठी हजारोंच्या संख्येची वज्रमुठ दाखवली. आरक्षणासह इतर प्रश्न सोडविण्यासाठी मराठा बांधव छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वात आक्रमक होताना दिसत आहेत.एकिकडे सर्व राजकीय पक्षांचे सभा ,मेळावे,आंदोलन होत असताना मराठा क्रांती मोर्चा आंदोलकांवर गुन्हा दाखल झाल्याने छत्रपती संभाजीराजे यांनी ट्विटच्या माध्यमातून आपले मत व्यक्त केले आहे.