गोसेवक गजानन पांचाळ व इतरावर हल्ला करणाऱ्यांवर कठोर कार्यवाही करून गोसेवकांना सुरक्षा देण्याची नायगाव बजरंग दलाची मागणी.
नायगाव, नांदेड –
बिलोली येथे गौसेवक गजानन पांचाळ व त्यांच्या सहकाऱ्यांवर हल्ला केलेल्या हल्लेखोरांवर कठोर कार्यवाही करून त्यांना अटक करावे व गजानन पांचाळ यांना पोलिस सुरक्षा पुरवण्याची मागणी नायगाव येथील बजरंग दलाच्या वतीने पोलीस ठाणे नायगाव येथे पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे याना निवेदन देऊन केली आहे.
हिंदू समाजाचा पवित्र पोळा सणाच्या दिवशी हिंदू समाज बैलाची मनोभावे पूजा करतो त्याच दिवशी बिलोली येथे सकाळी गाय आणि बैल ज्या ठिकाणी कापतात त्या ठिकाणी प्रशासनाला मदत करण्यासाठी गेलेल्या स्थानिक (बिलोली) बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर पोलिस प्रशासनासमोर मारहाण करण्यात आली. ज्यामध्ये बजरंग दलाचे कार्यकर्ते जखमी झाले आहेत.
त्या हल्लेखोरांवर कठोर कार्यवाही व्हावी व गजानन पांचाळ रा. बिलोली यांना पोलिस सुरक्षा पुरविण्यात यावी,अन्यथा संपूर्ण हिंदू समाज रस्त्यावर उतरेल व बजरंग दल व विश्व हिंदू परिषद हिंदू संघटना यावर आंदोलन करेन व पुढील काळात गजानन पांचाळ यांच्या जीवाला काही बरे वाईट झाल्यास त्याची संपुर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील,असे कळवण्यात आले आहे. निवेदनावर गणेश पैकमवार तालुका अध्यक्ष, गजानन बादवाड तालूका उपाध्यक्ष यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.