ग्रामीण जनतेला कायद्याची माहीती असणे आवश्यक- न्यायाधीश एम.डी.बिरहारी.

597

सखाराम क्षीरसागर

अर्धापूर, नांदेड –

सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालय यांच्या आदेशानुसार स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त अर्धापूर तालुका न्यायालय व विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने अर्धापूर तालुक्यात कायदे विषयक जनजागृती अभियान राबविण्यात आले. या अभियानांतर्गत तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील, महिला, विद्यार्थी आदींना कायदेविषयक माहिती दिली. यावेळी शाळा, कॉलेज, ग्रामपंचायती, तहसील, नगरपंचायत, शासकीय कार्यालये आदी ठिकाणी कार्यक्रम घेण्यात आले.

आज दि.१४ रोजी चित्रकला घेण्यात आली व सदर अभियानांतर्गत तालुका न्यायालयात शहतील विविध शाळा व विद्यालयातील विद्यार्थ्यांना कायदेविषयक माहिती देण्यात आली व त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे याप्रसंगी न्यायाधीश एम.डी.बिरहारी व शिक्षण वि. अ. गंगाधर राठोड यांनी दिली. यावेळी अध्यक्षस्थानी दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर एम.डी.बिरहारी तर प्रमुख पाहुणे म्हणून पोलिस उपनिरीक्षक बळीराम राठोड, तालुका अधिव्यक्ता संघाचे अध्यक्ष अँड.किशोर देशमुख, शिक्षण विस्तार अधिकारी गंगाधर राठोड, आरोग्य वि.अ.डॉ.एस. पी.गोखले हे उपस्थित होते. यावेळी विविध शाळेतील विद्यार्थी शिक्षक यांची उपस्थिती होती.

अर्धापूर शहरात न्यायालय ते बसस्थानक, अहिल्याबाई होळकर चौक – शहरातील प्रमुख मार्गाने कायदे विषयक जनजागृती रॅली काढण्यात आली व रविवार अक्षरांगण शाळेत चित्रकला स्पर्धा घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी ॲड.गजानन पत्रे, ॲड बालाजी नवले, ॲड गणेश देलमडे, ॲड भानुदास मगरे, महामार्ग मृत्युंजय दुत गोविंद टेकाळे, पत्रकार सखाराम क्षिरसागर, भ्र.नि.स.ता.अध्यक्ष लक्ष्मीकांत मुळे, सचिव गुणवंत विरकर, आनंद सिनगारे, पोलीस कर्मचारी आर.डी.घुले, अँड.सचिन देशमुख, अँड.पी.एम.सरोदे, अँड.नितेश लोणे, अँड.गौरव सरोदे, एम.एम.शेवाळकर, गुंडे आदी उपस्थित होते.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अर्धापूर तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागात कायदे विषयक जनजागृती अभियान राबविण्यात आले.दि.२ आक्टोंबर ते १४ नोव्हेंबर या दिवसात तालुक्यातील लहान, लोणी, मेंढला,पांगरी, पिंपळगाव महादेव, बामणी, नांदला – दिग्रस, पार्डी, धामदरी आदी ठिकाणी कायदे विषयक जनजागृती शिबिरे आयोजित करण्यात आली होती.

शहरासह ग्रामीण भागातील महिला, विद्यार्थी यांच्यासह सामान्य माणसाला कायदे विषयक माहिती असावी या उद्देशाने सर्वोच्च व उच्च न्यायालयाच्या आदेशाने कायदे विषयक माहिती अभियान राबविण्यात आले.

– एम.डी बिरहारी,
दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर अर्धापूर.

Leave A Reply

Your email address will not be published.