जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालयातील प्रा. रावसाहेब दोरवे यांना पी.एचडी.पदवी बहाल.

299
नांदेड –
नांदेडच्या सिडको परिसरातील जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालयातील प्रा. रावसाहेब दोरवे यांना ‘स्वारातीम’ विद्यापीठाच्या वतीने पी.एचडी. ही पदवी प्रदान करण्यात आली आहे.

संशोधक व मार्गदर्शक, प्राचार्य डॉ. प्रकाश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा.रावसाहेब दोरवे यांनी ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायद्याच्या अंमलबजावणीत ग्राम-पंचायतीची भूमिका एक अभ्यास'(संदर्भ नांदेड जिल्हा) या विषयावर महत्वपूर्ण संशोधन करून नांदेड येथील ‘स्वारातीम’ विद्यापीठाकडे शोधप्रबंध सादर केला आहे. प्रा.आर.सी.दोरवे यांच्या उपरोल्लेखित संशोधन कार्यासाठी सहसंशोधन मार्गदर्शक म्हणून प्रो.डॉ.घन:श्याम येळणे यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.

प्रा. दोरवे यांच्या यशाबद्दल श्री सेवादास शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ.नारायणराव उर्फ नानासाहेब जाधव व सचिव तथा नगरसेवक श्रीनिवास जाधव, प्राचार्य डॉ.डब्लू.आर.मुजावर, प्रा.डॉ.निरंजनकौर, प्रा. डॉ. नरहरी पाटील, प्रा.डॉ.मनिषा मांजरमकर, प्रा.डॉ.अशोक वलेकर, प्रा.डॉ.प्रतिभा लोखंडे, प्रा.डॉ.सत्वशीला वरगंटे, प्रा. सुनील राठोड, प्रा.डॉ.ए.ए.शेख, प्रा. डॉ.दिनेश मौने, प्रा.डॉ.संजय गवई, प्रा.डॉ.दिलीप कोठाडे, प्रा. गोपाल बडगिरे, प्रा.डॉ.शिवाजी शिंदे, प्रा.डॉ.अंबादास कर्डिले व प्रा.डॉ.मेघराज कपूर डेरिया यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून त्यांच्या पुढील सामाजिक तसेच शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.