जि.प.शिक्षक सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या अध्यक्षपदी रविंद्र पेंटलवार यांची बिनविरोध निवड.

687
नांदेड –

नांदेड जिल्ह्यात सर्वांना सुपरिचित व मोठी असलेल्या शहरातील विकासनगर, जुना कौठा, नांदेड येथील जि.प.शिक्षक सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या अध्यक्षपदासाठीची निवड प्रक्रिया नुकतीच पार पडली, यामद्धे नांदेड शहरातील जुना मोंढा भागातील कपड्याचे प्रसिद्ध व्यापारी रविंद्र रामचंद्रराव पेंटलवार यांची बिनविरोध निवड झाली आहे.

नांदेडच्या जुना कौठा भागातील विकासनगर येथील जि.प.शिक्षक सहकारी गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष साईप्रसाद उत्तमराव वरपडे यांच्याविरूध्द ९ सप्टेंबर २०२१ रोजी १० विरुध्द ० असा अविश्वास ठराव पारित झाला होता तद्नंतर उपरोक्त गृहनिर्माण संस्थेच्या अध्यक्ष पदाची निवडणूक नुकतीच पार पडली. त्यांच्या विरोधात एकही अर्ज आला नसल्याने ‘अध्यक्ष’पदी रविंद्र पेंटलवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

नांदेड शहरातील जुना मोंढा परिसरातील कपड्याचे प्रसिद्ध व्यापारी तथा “द क्लॉथ मर्चंट वेलफेअर असोसिएशन”चे सहसचिव रविंद्र पेंटलवार यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल दि क्लॉथ मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष लक्ष्मीकांत माळवतकर तसेच सचिव नरेश लालवाणी यांच्यासह माजी अध्यक्ष राजेंद्र हुरणे, केशव मालेवार, महेशभाई ठक्कर, प्रदिप खेडकर व त्यांच्या सहकारी- पदाधिकारी आणि व्यापारी बांधवाकडून तसेच शहरातील सर्व क्षेत्रातून संस्थेचे नूतन अध्यक्ष रविंद्र पेंटलवार यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. त्यांच्या निवडीमुळे जिल्ह्यातील व्यापारी वर्गात आनंदाचे वातावरण दिसून येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.