जीवनसिंह चंदेल यांचे निधन.

305

नांदेड –

नांदेडच्या हडको परिसरातील रहिवासी तथा आरोग्य विभागातील प्रयोगशाळा तंत्रज्ञ जीवनसिंह रघुसिंह चंदेल (वय-४९ वर्षे) यांचे १३ सप्टेंबर रोजी चंद्रपूर येथील रूग्णालयात उपचारा दरम्यान निधन झाले.

दिवंगत जीवनसिंह चंदेल यांच्या पार्थिव देहावर १४ सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजता नांदेडच्या सिडको परिसरातील वैकुंठधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा, एक मुलगी,आई,वडील,बहिण तसेच भाऊ असा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते पवनसिंंह चंदेल यांचे ते जेष्ठ बंधू होत. जीवनसिंह चंदेल यांच्या अकाली निधनाबद्दल नवीन नांदेड परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.