ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कै.प्रा.डॉ सत्यजित चिखलीकर स्मृतिदिनी अनाथ मुलींना अन्नदान.

476
नांदेड –
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा विद्यार्थीप्रिय प्राध्यापक कालवश प्रा.डॉ.सत्यजीत चिखलीकर यांच्या 16 व्या स्मृतिदिना निमित्त सामाजिक जाणिवेतून कल्पतरू कल्चरल फाउंडेशन, नांदेड तर्फे अनाथ मुलींचे सुमन बालगृह, रामनगर, नांदेड येथे दि.19 जानेवारी 2022 रोजी अन्नदानाचे आयोजन करण्यात आले होते. सुमन बालगृहाच्या संचालिका सौ.भालके मॅडम यांनी याप्रसंगी स्मृतीशेष प्रा.डॉ.सत्यजित चिखलीकर यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्याप्रसंगी अनेक अनाथ मुली उपस्थित होत्या.यावेळी कल्पतरू फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. डॉ. राजपालसिंह चिखलीकर, हेमलता चिखलीकर, प्रा.डॉ भाग्यरेषा गजभिये-चिखलीकर यावेळी उपस्थित होते.
दरवर्षी कल्पतरू कल्चरल फाउंडेशन तर्फे स्मृतीशेष प्रा.डॉ सत्यजित चिखलीकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतो. या माध्यमातून गरजू गोरगरीब लोकांना मदत करण्यात येते. याबद्दल समाजातील सर्व स्तरातून सामाजिक कार्याचे कौतुक होत आहे. प्रा.डॉ सत्यजित चिखलीकर हे भारतीय बौद्ध महासभेचे प्रदेशाध्यक्ष व येवला मुक्ती प्रतिष्ठान येवलाचे सचिव तथा समाजसेवक होते. पिपल्स महाविद्यालय, नांदेड येथे प्राध्यापक म्हणून अनेक वर्ष कार्यरत होते तसेच स्वा.रा.ती.म. विद्यापीठ, नांदेड येथे यशस्वी विद्यार्थी कल्याण संचालक म्हणून काम केले ,ते एक विद्यार्थीप्रिय प्राध्यापक म्हणून नांदेड जिल्ह्याला परिचित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.