तहसीलदार उज्वला पांगरकर यांनी घेतला विशेष नवीन मतदार नोंदणी मोहीमेचा आढावा.

1,030

सखाराम क्षीरसागर

अर्धापूर, नांदेड –

निवडणुक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे नवीन मतदार नोंदणीची विशेष मोहीम सुरु आहे.या पार्श्वभूमीवर अर्धापूरच्या तहसीलदार उज्वला पांगरकर यांनी आज दि.१३ शनिवारी रोजी शहरातील अनेक मतदान केंद्राला भेटी देऊन आढावा घेतला आहे.
त्यांनी बी.एल.ओ.यांना कामाच्या बाबतीत आदेश दिले. त्यांच्यासमवेत मंडळ अधिकारी शेख शफीयोद्दीन, निवडणूक विभागातील गिरीश गलांडे होते.यावेळी बी.एल.ओ.कैलास दमकोंडावार, शेख जावेद नूर मोहम्मद, काझी अन्वर, वैजनाथ हंगरगे यांनी तहसीलदार उज्वला पांगरकर यांचे स्वागत केले.
यावेळी माहिती देताना पांगरकर म्हणाले की, आगामी काळात नगरपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम आहे यासोबतच कोणत्याही निवडणुका असो कोणतीही व्यक्ती मतदानापासून वंचित राहू नये सर्वांनी आपले नाव मतदार यादीत नोंदणी करावी आवश्यकता असल्यास आपल्या नावात दुरुस्ती करून घ्यावी असे आवाहन तहसीलदार उज्वला पांगरकर यांनी जनतेला केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.