दीपावलीच्या पार्श्वभूमीवर आ.राजेश पवार व सौ.पूनम पवार यांच्याकडून स्नेहभोजनाचा कार्यक्रम संपन्न. पुरुष, आबालवृद्धांसह महिलांची लक्षणीय उपस्थिती.
नायगाव, नांदेड –
नायगाव तालुक्याचे आ.राजेश पवार व जि.प.सदस्या पूनमताई पवार यांच्या वतीने दीपावलीच्या पार्श्वभूमीवर नायगाव तालुक्यातील भाजप परिवारातील कार्यकर्ते, जनता यांना सहकुटुंब स्नेह भोजनाचा कार्यक्रम १३ नोव्हेंबर रोजी नायगाव येथे कुसुम मंगल कार्यालयात घेण्यात आला. यावेळी तालुक्यातील भाजप परिवारातील सहकुटुंब आबाल वृद्ध व महिला जनतेची लक्षणीय प्रमाणात उपस्थिती होती. यावरून तालुक्यातील जनतेचे प्रेम हे अद्यापही आ.पवार व पुनमताई यांच्यावर कायम असल्याचे दिसून आले.
स्व.भाजप नेते संभाजी पवार यांच्या स्मृतीला अनुसरून आ.राजेश पवार यांनी कोरोनाच्या व पावसाळी संकटा नंतरच्या काळात स्नेहभोजनाचा कार्यक्रम घेतला. मागच्या दोन वर्षाच्या कोरोनाच्या कार्यकाळात जनतेच्या आरोग्य विषयी प्रश्न असो किंवा रुग्णालयाचे कोणते काम असो मतदारसंघातील नागरिकांची भेट घेऊन आ. राजेश पवार व पूनमताई पवार यांनी वेळोवेळी संपर्कात राहून केलेली कामे, या स्नेहाने जनसमुदाय मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.
लसीकरणाच्या बळावर थोडीफार परिस्थिती पूर्वपदावर येत असल्याने मतदारसंघातील नागरिकांच्या आपल्या भेटीगाठी होण्यासाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळेस शाहीर संतोष पाटील लातूर आणि संच यांच्या पोवाड्याचे व लोकप्रबोधन पर गीतांचा कार्यक्रम घेण्यात आला. महिलांची उपस्थिती स्नेह भोजनाच्या कार्यक्रमाची आणखीनच शोभा वाढविल्याचे दिसून आले.उपस्थित बालकांना स्केज पेन पॉकेट व चॉकलेट वाटप करून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्यात आला. आलेल्या प्रत्येक नागरिकांची पवार दाम्पत्याने आस्थेवाईकपणे चौकशी केली व पारिवारिक माहितीचे पत्रक भरून घेण्यात आले.
या कार्यक्रमात आ.राजेश पवार जनतेशी संवाद साधताना म्हणाले की मी जनसेवाच्या माध्यमातून पीक विमा,विद्युत वितरणचे प्रश्न,शेतकऱ्याच्या सोयी सुविधा,अतिवृष्टीने झालेले नुकसान, पिकाच्या आणेवारीसाठी अनेक वेळा रस्त्यावर उतरून प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला असून, पीक विम्याच्या बाबत विमा कंपनीने घोर निराशा केली असून यासाठी भविष्यात जिल्हा स्तरावर मोठ्या प्रमाणात आंदोलन करणार असे जाहीर करताच उपस्थितांनी जोरदारटाळ्यांच्या कडकडाटात प्रतिसाद दिला.
यावेळी कार्यक्रमाचे उदघाटन राजेश कुंटुरकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलनाने करण्यात आले.यावेळी लोक्याबाई संभाजी पवार, दिलीपराव धर्माधिकारी, सौ.छायाताई धर्माधिकारी, नगरसेवक देविदास पाटील बोंमनाळे, सूर्याजी पाटील चाडकर, पत्रकार संघ जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब पांडे,भगवान पाटील लंगडापुरे, शहराध्यक्ष शंकर पाटील कल्याण, ता.अध्यक्ष कोंडीबा पाटील शिंदे,व्याख्याते सोपान पा कदम, बाबासाहेब हंबर्डे,परमेशवर पा धानोरकर, माधव कोलगाणे, अवकाश पा धुपेकर, व्यंकटराव गित्ते, व्यंकट पा सुगावे साहेब, राहुल पाटील नकाते, सुनील शिंदे, नागेश पा.कल्याण, शिवराज माली पाटील रातोळीकर, प्रा जीवन चव्हाण, हरीचंद्र चव्हाण अवकाश पाटील धुपेकर,आदींची उपस्थिती होती.या प्रसंगी राजेश कुंटुरकर, पुनमताई पवार, सूर्याजी पाटील चाडकर, शंकर कल्याण, कोंडीबा पाटील ,सोपान कदम, बाळासाहेब पांडे आदींनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचलन श्रीहरी देशमुख यांनी केले, तर आभार देविदास पा.बोंमनाळे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धनंजय जाधव, श्रीकांत शिंदे, तुकाराम घटेवाड,शिवराज जाधव, पपु पाटील रातोळीकर, युवराज लालवंडे,विजय बैस,रणजित कुरे,शरद पाटील माहेगावकर ,मलिकार्जुन आपा बामणे यासह अनेक कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले.
येत्या जि.प.निवडणुकीत बरबडा सह कोणत्याही जागेवर सर्वसाधारणचे आरक्षण सुटो त्या ठिकाणाहून पुनमताई निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असे संकेत उपस्थित समर्थक कार्यकर्त्यांच्या मनोगतातुन व्यक्त करण्यात आले व त्याला आ.राजेश पवार व पुनमताई पवार यांनी ताकाला जाऊन भांडे न लपवता आम्ही दुजोरा देतो असे म्हणत प्रतिसाद दिला.