देगलूर तालुक्यात पाऊस मोठ्या प्रमाणात झाल्याने शेतकर्‍यांचा जीव टांगणीला..

तालुक्यातील सोयाबीन मातीमोल; खरीप पाण्यात..

404

रामचंद्र भंडरवार

देगलूर, नांदेड –

परतीच्या पावसाने देगलूर तालुक्यात अक्षरशः थैमान माजवला असून अहोरात्र कष्ट करुन हातातोंडाशी आलेला शेतकर्‍यांचा घास या पावसाच्या लहरीपणामुळे पूर्णतः नाहीसा झाला आहे.खरीप हंगामाच्या सुरुवातीपासूनच शेतकर्‍यांवर निसर्गासह बोगस बियाणे, प्रभावहीन औषधी आदीच्या माध्यमातून संकट हात धूवून पाठीमागे लागले आहेत दरम्यान सतत पावसामुळे तालूक्यातील सर्वच भागातील खरीपाचे अतोनात नुकसान झाले असून परिणामी आज घडीला शेतकरी वर्गाला शेतातील माती वगळता हाताला काहीच लागत नसल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

दरम्यान गत तीन ते चार वर्षापासून शेतातील सोयाबीन, मुग,उडिद काढणीच्या वेळी अतिवृष्टीमुळे शेतकरी हातघाईस आला आहे. देगलूर तालुक्यातील प्रत्येक गावातील शेतात जावून पीक पाहणी केली असता सोयाबीनला जागीच कोंब फुटले असल्यामुळे शेतकर्‍यांनी उत्पन्नाची आस सोडून दिली आहे. यंदा दुबार तिबार पेरणी झाली असून काही शेतात तर सोयाबीनच उगवले नाहीत हे विशेष.. दरम्यान पावसामुळे खरीप हंगामाच्या सुरुवातीपासून जवळपास तीन ते चार वेळेस अतिवृष्टी झाली शासनाने पंचनामे करण्याचे आदेशही दिले पण “शासनाचे काम बारा महिने थांब” यामुळे शेतकर्‍यांना आतापर्यंत पदरी काहीच आर्थिक मदत तर मिळाली नाही परंतू नुकसान झालेल्या पिकांच्या शासन व पिक विमा कंपनीच्या कानावर घालण्यासाठी पदरमोड करावी लागली त्यामुळे शेतकर्‍यांना आर्थिक व मानसिक ताण सहन करावा लागला हे मात्र वेगळेच आतातरी शासन प्रशासन उघड्या डोळ्याने आणि शांत मनाने शेतकर्‍यांच्या विचार करुन तात्काळ आर्थिक मदत जाहीर करुन विनाविलंब शेतकर्‍यांच्या हातात पडतील असे नियोजन करावे अशी प्रतिक्रीया मेटाकुटीस आलेल्या तालूक्यातील बळीराजांकडून व्यक्त होत आहेत.

तालुका व परिसरातील शाश्वत पीक म्हणून शेतकऱ्यांनी सोयाबीनची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. यंदाच्या निसर्गाच्या अवकृपेमुळे ऐन बहाराच्या काळात अतिवृष्टीमुळे सोयाबीनचे शेंगा काळ्या पडून कुजरोगाची लागण झाली त्यामुळे उत्पादनात कमालीची घट होणार आहे. तालुक्यातील एकूण शेतजमीन क्षेत्रापैकी सर्वाधिक सोयाबीनची लागवड आहे.मुग, उडीद, कापूस ही पिके मागील काही वर्षांपासुन बे-भरवश्याची असल्याने आपसुकच शेतकरी सोयाबीन पिकाकडे वळले. मात्र सततच्या अतिवृष्टी व ढगफूटी सदृश्य पावसामूळे ऐन शेंगा परिपक्व होत असतानाच शेंग काळी पडून कूजत असल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.