धक्कादायक..! अल्पवयीन मुलीची स्मशानभूमीतील पूजेचा अघोरी प्रकार उघड.
वाई, सातारा –
सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील सुरूर येथे अल्पवयीन मुलीची स्मशानभूमीत पूजा केल्याचा धक्कादायक व अघोरी प्रकार समोर आला आहे. स्मशानभूमीच्या कट्ट्यावर मुलीच्या मांडीवर कोंबडा देऊन मांत्रिकाने पूजन केल्याचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाल्याने हा प्रकार उघड झाला आहे.अल्पवयीन मुलीची स्मशानभूमीत पूजा केल्याचा प्रकार युवकांच्या निदर्शनास येताच मांत्रिकासह अल्पवयीन मुलगी तसेच नातेवाईक बेपत्ता झाले आहेत.
या व्हिडिओमध्ये अल्पवयीन मुलीची स्मशानभूमीतील पूजेवेळी तिच्या मांडीवर कोंबडा देवून मुलीच्या सभोवती कुंकवाने काढलेल्या वर्तुळात तिला बसविण्यात आलयाचे दिसत आहे व तिच्यासमोर बसलेल्या मांत्रिकाने मुलीसमोर अंडे, लिंबू नारळ इत्यादी साहित्य जवळ ठेवल्याचे दिसून येत आहे. हा धक्कादायक प्रकार सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील सुरूर गावच्या स्मशानभूमीत घडला आहे. अल्पवयीन मुलीच्या स्मशानभूमीतील पुजनामुळे चर्चेला उधाण आले आहे. या घटनेचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाल्यानंतर मांत्रिक, अल्पवयीन मुलगी तसेच तिचे कुटुंबिय फरार आहेत.