धक्कादायक ! नांदेडमद्धे अकरा वर्षाच्या मुलाकडून १० वर्षीय मुलीवर बलात्कार

पालकांनो, मुलांकडे लक्ष द्या..

4,037
नांदेड –
कोरोनामुळे शाळकरी मुलांच्या हातात नकळत्या वयात मोबाईल आले आहे. मोबाईल वर ऑनलाईन शिक्षण सुरु आहे. मुले काय करतात, याकडे लक्ष देण्यासाठी पालकांना वेळ नाहीये. अशातच एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नांदेड जिल्ह्यातील लिंबगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवघ्या अकरा वर्षांच्या मुलाने बलात्कार केल्याचा आरोप आहे. अल्पवयीन मुलाच्या अत्याचाराला बळी पडलेली पीडिताही अल्पवयीनच आहे. ती दहा वर्षीय असून या मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे पोलीसही चक्रावून गेले.
मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. त्यासाठी पालकांनी मुलांच्या हातात मोबाईल दिले आहेत. त्यामुळे मुलांचे पाऊल मात्र वाकडे पडत आहे. नकळत्या वयात हातात आल्यामुळे हा धक्कादायक प्रकार घडल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अल्पवयीन पीडितेच्या पालकांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. नांदेड जिल्ह्यातील लिंबगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवघ्या अकरा वर्षाच्या मुलाने शेजारच्या मुलीला घराच्या पाठीमागे नेऊन तिच्यावर अत्याचार केले. याप्रकरणी पालकांच्या तक्रारीवरुन लिंबगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. नकळत्या वयात हातात आलेल्या इंटरनेटच्या सहज उपलब्धतेमुळे कोवळ्या बालमनावर दुष्परिणाम वाढल्याचे या घटनेमुळे दिसून येत आहे.
या प्रकरणातील मुलगा आणि मुलगी एकमेकांच्या शेजारी राहतात. दोन्ही मुले ऑनलाईन शिक्षण घेत होती, ऑनलाईन शिक्षणासाठी ते एकत्र येत असत, अशी माहिती आहे. अत्याचाराच्या घटनेनंतर मुलीने त्रास होत असल्याचे तिने घरच्यांना सांगितले, तेव्हा हा प्रकार उघडकीस आला, असे पोलिसांनी सांगितले. पीडिता आणि आरोपी दोन्ही अल्पवयीन असल्याने पोलीस बालरोग तज्ज्ञांसह मानसोपचार तज्ज्ञांचीही मदत घेत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.