धक्कादायक बातमी ! नांदेडच्या धर्माबाद रेल्वे स्थानकावर महिलेला लुटून अत्याचार; दोन आरोपी ताब्यात

2,126
धर्माबाद, नांदेड –
नांदेडच्या धर्माबाद रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म नंबर दोनच्या बाजूला जिल्ह्यातील उमरीतील एक महिला थांबली होती.ती एकटीच असल्याची संधी साधत धर्माबाद येथील दोन आरोपीने तिच्या जवळ जाऊन जबरीने तिच्या जवळील 75 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे गंठण जबरीने लुटले एवढेच नाही तर तिच्यावर या दोघांनी अत्याचार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
सदरील घटना दि. 21 जानेवारीच्या पहाटेच्या सुमारास घडली. त्यानंतर सकाळी पीडित महिला नांदेड लोहमार्ग पोलिस ठाण्यात हजर झाली. घडलेला संपूर्ण प्रकार तिने पोलिसांना सांगितला. पोलिसांनी तात्काळ तपास यंत्रणा हलवत धर्माबाद येथील दोन्ही आरोपींना अटक केली. दरम्यान, धर्माबाद घटनास्थळाला लोहमार्ग पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी भेट दिली असून दोन्ही आरोपींना न्यायालया- समोर हजर करण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती बोइने या औरंगाबाद येथे रवाना झाल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.