धक्कादायक! “बिग बॉस” फेम विजेता अभिनेता सिद्धार्थ शुक्ला यांचं निधन.
मुंबई-
अभिनेता सिध्दार्थ शुक्ला यांचं वयाच्या ४० व्या वर्षी निधन झालं. हृदयविकाराच्या धक्क्याने त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय.मुंबईतील कूपर रुग्णालयात गुरुवारी सिध्दार्थने अखेरचा श्वास घेतला. सिध्दार्थ शुक्ला हा बिग बाॅस १३ चा विजेता आहे.
१२ डिसेंबर,१९८० रोजी त्याचा जन्मदिवस होता. बालिका वधू, दिल से दिल तक अशा मालिकांमधून त्याने काम केलं आहे. हम्टी शर्मा की दुल्हनिया या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केल होतं. ब्रोकन बट ब्युटिफुल या वेब सीरीजमद्धेही त्याने काम केले होते,अनेक हिंदी मालिकांमधून त्याचा चेहरा घराघरांत पोहचला होता.