धक्कादायक !हार्ट अटॅक आलेल्या रुग्णावर उपचार करताना डॉक्टरला आला हृदयविकाराचा झटका.

रुग्ण व डॉक्टर दोघांचा झाला मृत्यू.

2,588
NEWS HOUR मराठी डेस्क,  हैदराबाद –
हैदराबादमधील एका रुग्णालयात हृदयरोगाच्या पेशंटवर उपचार करत असताना उपचार करणाऱ्या एका डॉक्टरालाच हृदयविकाराचा झटका आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.यात डॉक्टरचा रुग्णालयातच मृत्यू झाला तर ज्या रुग्णावर डॉक्टर उपचार करत होते,त्या रुग्णाचाही काही वेळानंतर मृत्यू झाला. यात डॉक्टरचे वय अवघे 40 वर्षे होते.
हैदराबादच्या गुजाला भागात राहणारा 60 वर्षीय जगिया नाईक यांना 28 नोव्हेंबर, रविवारी सकाळी हार्ट अटॅक आला होता. उपचारासाठी त्यांना कामारेड्डी जिल्ह्यातील गांधारी मंडलच्या एस.वी.श्रीजी नर्सिंग होम येथे आणण्यात आलं. रुग्णालयाच्या आयसीयू मध्ये डॉ. लक्ष्मण व त्यांची टीम त्यांच्यावर उपचार करण्यासाठी पोहोचले. डॉ.लक्ष्मण रुग्णावर उपचार करत होते, तेवढ्यात त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि ते खाली पडले.
हृदयविकाराचा झटका आल्यानंतर डॉ.लक्ष्मण यांना सहकाऱ्यांना आपात्कालीन उपचार दिले. मात्र त्यांना वाचवता आलं नाही. यानंतर रुग्णालयातील कर्मचारी त्यांचा मृतदेह आयसीयूच्या बाहेर घेऊन आले. या दरम्यान उपचार घेत असलेले नाईक यांची प्रकृती बिघडली. रुग्णाचे कुटुंबीय त्यांना दुसऱ्या रुग्णालयात घेऊन गेले. मात्र दुसऱ्या रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. डॉ.लक्ष्मण हे प्रसिद्ध चिकित्सक होते त्यांच्या अशा मृत्यूने हळहळ व्यक्त होत असून स्थानिकांना चांगलाच धक्का बसला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.