धर्माबाद तालुक्याचे भूमिपुत्र मोईजोद्दीन करखेलीकर यांचा धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त धर्माबाद तालुक्यातील बौद्ध बांधवासाठी अनोखा उपक्रम.

नागपूर येथील दीक्षाभूमीचे मोफत दर्शन.

441

धर्माबाद, नांदेड –

महामानव तथा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समता, न्याय व बंधुत्व या विचारांशी प्रेरित होऊन धर्माबाद तालुक्याचे भूमिपुत्र मोईजोद्दीन करखेलीकर यांनी तालुक्यातील बौद्ध बांधवांसाठी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त शुभेच्छा म्हणून नागपूर येथील दीक्षाभूमी चे मोफत धम्म प्रवास आयोजित केले आहे. धर्माबाद तालुक्यातील करखेली,चिकना राजापूर, पांगरी,जुनी,बाचेगाव, धर्माबाद शहरातील इंदिरा नगर, फुलेनगर, रमाई नगर तसेच बाळापूर येथील एकुण दीडशे बौद्ध लोकांचा जत्था नागपूर येथे जाण्यासाठी आज संध्याकाळी रवाना होणार आहे.

यापूर्वीही मोईजोदिन बिडीवाले यांनी अनेक सामाजिक कार्यात सहभाग नोंदवत समाजातील उपेक्षित गोरगरिबांची सेवा केली होती. कोरोना संक्रमणाच्या काळामध्ये अनेक गावांमध्ये मोफत गोरगरिबांना धान्य वाटपाचा उपक्रम त्यांनी राबवून अनेक गोरगरीबांचे आशीर्वाद घेतले आहेत.
मोहिजोद्दिन बिडीवाले आपल्या कंत्राटी उद्योगांमध्ये भरभराटी करत असताना अनेक विरोधकांकडून त्यांच्या या स्तुत्य उपक्रमावर जरी टीका करत असली तरी निस्वार्थ भावनेने हे कार्य करीत असून जनसामान्यांच्या सेवेसाठी मी गोरगरिबांच्या सेवेसाठी सदैव तत्पर आहे,असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.टीकाकार अनेकांवर टीका करतात, चांगल्या कामावर नेहमीच टीका होते. मी टीकेला घाबरत नाही ईश्वराकडून मला जी समाजसेवा करण्याची प्रेरणा मिळते त्यातून मी हे काम करत आहे आणि हे मी सदैव करत राहणार टीकाटिपण्णीला मी लक्ष देत नाही असे त्यांनी सांगितले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.