धर्माबाद पोलीस ठाण्यात नवे पोलिस निरीक्षक संजय हिबारे रुजू होणार.
धर्माबाद, नांदेड –
देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने तत्कालीन पोलिस निरीक्षक सोहन माछरे यांच्या बदलीनंतर रिक्त झालेल्या धर्माबाद पोलीस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक पदी संजय हिबारे हे धर्माबाद पोलीस ठाण्याचा चार्ज आज संध्याकाळपर्यंत घेऊन ते धर्माबाद येथे रुजू होणार असल्याचे वृत्त आहे.
तेलंगाना राज्य सिमेवर असलेल्या धर्माबाद तालुक्यात अनेक व्यापारी, व्यावसायिक बाजारपेठ असून येणाऱ्या काळात होणाऱ्या नगरपालिका जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत निरपेक्ष वृत्तीने काम करण्याचं आव्हान त्यांच्यासमोर आहे.