नरसी- मुखेड रोडवर गडग्याजवळ मोटारसायकल व ट्रॅव्हल्सची समोरासमोर धडक; तिघे गंभीर जखमी, एकाची प्रकृती चिंताजनक.

1,278

नायगाव, नांदेड –

नरसी मुखेड रस्त्यावर गडगा येथील पट्रोल पंपाजवळ मोटारसायकल व ट्रॅव्हल्सच्या समोरा समोरील अपघातात तिघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली असून एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे कळते.नरसी मुखेड रोडवर आज दि.१५ रोजी दुपारी १२.३० ते १ च्या दरम्यान घडली.

अपघातातील तिघांची परिस्थिती गंभीर असल्याने ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेडच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
नरसीहून मुखेडकडे जाणारी एम एच ०४ – जी ३४१२ या क्रमांकाची खाजगी ट्रॅव्हल्स गडगा मार्गे मुखेडकडे जात होती तर गडगा येथून नरसीकडे भरधाव जाणाऱ्या मोटारसायकल स्वाराने एम एच २६ जे ७९३ ने ट्रॅव्हल्सला गडगा पासून एक कि.मी.अंतरावर समोरासमोर जोराची धडक दिली.यात शादूल सलमान खान (२५), शेख मजहर (२४) व रमजान शेख रा.नायगाव तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. यातील एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे कळते.सदर अपघाताची माहिती समजताच गडगा बिटचे जमादार सहायक पोलीस उप निरिक्षक वाघमारे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी त्यांनी रुग्णवाहिकेला पाचारण करुन सर्व जखमींना नायगावच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवले. पण जखमींची परिस्थिती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी विष्णुपुरीच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.


एकाच मोटारसायकलवर तिघे बसने हा अपराध असताना तिघांनी बसून गाडी भरधाव वेगात चालवल्याने हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले. हा अपघात ट्रॅव्हल्सला समोरासमोर धडक दिली असल्याने घडला. अपघातात तिघेजण गंभीर जखमी तर झालेच पण ट्रॅव्हल्स चालकाने वाचवण्याचा प्रयत्न करताना ट्रव्हल्सचेही बरेच नुकसान झाले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.