नवीन वर्षात ‘आयआयबी’चा नवा संकल्प ; “स्वप्नभूमी” येथील विद्यार्थ्यांचे डॉक्टर बनण्याचे स्वप्न पूर्ण करणार

11 वी व 12 वी 'नीट'ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना घेतले दत्तक

587
नांदेड –
समाजातील गरीब, दुर्लक्षित वर्गाच्या विकासासाठी आपला हातभार लागावा या उद्देशाने मराठवाड्यातील केरवाडी या छोट्याशा गावात १० मे १९८० रोजी सामाजिक आर्थिक विकास संस्था – ‘स्वप्नभूमी’ची (एसईडीटी – सोशिओ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ट्रस्ट) स्थापना केली. विशेषतः लहान मुलांसाठी कार्य करणाऱ्या या संस्थेद्वारे इतर अनेक सामाजिक घटकांवर काम केले जाते. शिक्षण, बालमजुरी, मुलांचे सामाजिक प्रश्न, सामाजिक आरोग्य, विशेष करून एचआयव्ही-एड्सशी संबंधित काम, महिला सक्षमीकरण, शेती करणाऱ्या महिलांना प्रगत शेती तंत्रज्ञानाची माहिती करून देणे, उपेक्षित मुलांचे पुनर्वसन करणे, त्यांना उत्तम दर्जाच्या शिक्षणाबरोबरच उत्तम आरोग्य आणि इतर सुविधा उपलब्ध करून देणे,यांसारखे अनेक उपक्रम ‘स्वप्नभूमी’तर्फे चालवले जातात.

नवीन वर्षाच्या सुरुवातीला आयआयबी ने स्वप्नभूमी येथे भेट देऊन तेथील विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना नववर्षाची भेट म्हणून शैक्षणिक साहित्य वाटप केले. तसेच यापुढे आयआयबी कडून स्वप्नभूमीच्या विद्यार्थ्यांना नीट च्या तयारीसाठी मदत करण्याचा संकल्प नवीन वर्षाच्या निमित्ताने करण्यात आला.
दशरथ पाटील, संचालक, आयआयबी नांदेड व लातूर.
1976 पासून सुरू असलेल्या या अविरत सेवेला जवळपास 45 वर्ष उलटून गेली. मा.सुर्यकांत रामरावजी कुलकर्णी (बाबा) अध्यक्ष, स्वप्नभूमी केरवाडी, माणिक ताई कुलकर्णी (आई) यांच्या अकल्पनिय कार्यात खारीचा वाटा आयआयबीने उचलत 11 वी व 12 वी साठी NEET ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना दत्तक घेतले आहे. सोबत स्वप्नभूमीच्या डिस्कव्हरी सायन्स प्रकल्पास भेट दिली असता स्वप्नभूमीचे कार्यवाहक विष्णू जाधव सर आणि विरभद्र देशमुख सर यांनी सायन्स सेंटर बद्दल पूर्ण माहिती दिली.

सामाजिक कार्यात आयआयबी नेहमी अग्रेसर असते. मागील वर्षी गडचिरोली येथील आदिवासी विद्यार्थ्यांना आयआयबी च्या वतीने नीट साठीच्या सर्व शैक्षणिक साहित्य ऑनलाईन क्लासेस उपलब्ध करून दिले आहेत. कोचींग क्षेत्रातील आदर्श संस्था म्हणून आयआयबीने देशभर ख्याती मिळवली आहे. नीट २०२१ च्या निकालात आयआयबी च्या ३३ विद्यार्थ्यांना बायोलॉजी विषयात ३६० पैकी ३६० तर १४९ विद्यार्थ्यांना ७२० पैकी ६०० च्या मार्क्स आहेत. यावरून हे स्पष्ट होते कि केवळ शिक्षणच नाही तर सामाजिक क्षेत्रातही आयआयबीने आदर्श निर्माण केला आहे.

आयआयबीच्या वतीने दरवर्षी 11 वी आणि 12 वी च्या 3000 विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश अथवा 4.80 करोडची शिष्यवृत्ती फिसच्या स्वरूपात दिली जाते. सामाजिक दृष्टीकोन ठेवून सुरू झालेली आयआयबी आजही प्रत्येक सामाजिक कार्यात अग्रेसर असते.होतकरू आणि गरीब विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश, क्लासेसच्या परिसरात स्वखर्चाने सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही यंत्रणा, पोलीस चौकी, कंन्ट्रोल रूम, कोल्हापूर येथील पूरग्रस्तांना मदत, गडचिरोली येथील आदिवासींना मोफत शिक्षण इत्यादी सामाजिक कामे आयआयबीने केले आहे. सामाजिक जाणिवेचे डॉक्टर्स घडवून खेडोपाड्यात वैद्यकीय सेवा मिळावी ही आयआयबीचे मिशन आहे. यावर्षी विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी आयआयबीने फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी हे तीनही विषय एकाच ठिकाणी सुरू केले आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.