नशेत घरासमोरील झाडाला गळफास घेवून तरूणाची आत्महत्या.

708

नांदेड –

एका ३५ वर्षीय तरूणाने दारूच्या नशेत साडीने गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपविली. ही घटना ११ सप्टेंबर रोजी मध्यरात्री नवीन नांदेड भागातील वाल्मिकी नगर, वाघाळा येथे घडली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार, नांदेडच्या सिडको परिसरातील वाल्मिकी नगर, वाघाळा येथील शंकर लक्ष्मणराव जाधव यांना काही महिन्यांपासून दारू पिण्याचे व्यसन होते. दरम्यान, शंकर जाधव यांनी दारूच्या नशेत ११ सप्टेंबर रोजी रात्री साडे दहावाजेच्या दरम्यान त्यांच्या राहत्या घरासमोरील शेवग्याच्या झाडाला साडीने गळफास घेवून आत्महत्या केली आहे, अशी माहिती ठाणे अंमलदार लक्ष्मण सूर्यवंशी व मदतनीस पो.कॉ.ज्योती आंबटवार यांनी दिली.

विशेष म्हणजे, हमालीचे काम करणाऱ्या शंकर जाधव यांच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजले नसले तरी पोलीस तपासा अंती त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकेल, असा अंदाज पोलिसांकडून वर्तविण्यात येत असल्याची माहिती ठाणे अंमलदार ज्ञानोबा गिते यांनी दिली आहे. याप्रकरणी कमलबाई लक्ष्मणराव जाधव यांच्या माहितीच्या आधारे नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली. पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक महेंद्र कवठेकर व त्यांचे अन्य सहकारी पोलीस कर्मचारी हे याप्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.