नांदेडचे भूमिपुत्र असलेले जिल्हाधिकारी प्रशांत पाटील यांना निवडणूक आयोगाचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार

1,820
नांदेड –
नांदेड जिल्ह्यातील काटकळंबा गावचे सुपुत्र असलेले व तेलंगणा राज्यामध्ये नलगोंडा येथे जिल्हाधिकारी पदावर कार्यरत असलेले प्रशांत जीवनराव पाटील यांना तेलंगणा राज्य निवडणूक आयोगाने उत्कृष्ट जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून गौरवित केले आहे.
भारतीय निवडणूक आयोगाकडून दरवर्षी २५ जानेवारी राष्ट्रीय मतदार दिनाच्या दिवशी हे पुरस्कार जाहीर केले जातात. राज्यातील निवडणुकीचे काम केलेले सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी त्याच्या कामकाजाप्रती दिलेले योगदान विचारात घेऊन या निवडणुकीसाठी प्रभावी व उत्कृष्ट कामगिरी केलेल्या जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी, उपजिल्हाधिकारी व उपजिल्हा निवडणूक अधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांना पुरस्कार जाहीर केले जातात.
नलगोंडा जिल्ह्यात निवडणुकीचे संचलन तसेच आदर्श आचारसंहितेचे संदर्भात सर्वोत्कृष्ट काम केल्याबद्दल राज्य निवडणुक आयोगाकडून नलगोंडा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी प्रशांत पाटील यांनी उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल उत्कृष्ठ अधिकारी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल नांदेड जिल्ह्यातील सर्व स्तरातून प्रशांत पाटील यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.