नांदेडचे सुपुत्र विवेक चौधरी होणार देशाचे नवे हवाई दल प्रमुख.

1,606

नवी दिल्ली-

महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्याचे सुपुत्र एअर मार्शल विवेक राम चौधरी हे भारतीय हवाई दलाचे नवीन प्रमुख एअर चीफ मार्शल असणार आहेत.भारतीय हवाई दलाचे विद्यमान प्रमुख आर.के.भदौरिया हे येत्या 30 सप्टेंबर रोजी निवृत्त होत आहेत. त्यांच्या जागी विवेक चौधरी यांची एअर चीफ मार्शल म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

देशाचे नवे एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी हे नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्याच्या हस्तरा या गावचे रहिवासी आहेत. चौधरी हे राष्ट्रीय संरक्षण अकादमीचे माजी विद्यार्थी आहेत. एअर मार्शल विवेक चौधरी यांनी हवाई दलात अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. चौधरी हे यापूर्वी भारतीय दलाच्या वेस्टर्न कमांडचे कमांडर इनचीफ होते. चौधरी यांनी जुलै महिन्यात हवाई दलाच्या उपप्रमुख पदाचा कार्यभार स्वीकारला होता.29 डिसेंबर 1982 रोजी ते वायुसेनेत रुजू झाले होते.सुमारे तीस वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी हवाईदलाच्या वेगवेगळ्या विभागात काम केले आहे.

त्यांचे प्राथमिक शिक्षण नांदेड येथे पूर्ण झाले असून पुढील शिक्षणासाठी ते पुण्याच्या मिलिटरी स्कूलला गेले. विवेक चौधरी यांचे आजोबा हदगाव तालुक्यातील कोळी येथे जिल्हा परिषद शाळेत शिक्षक होते तर विवेक चौधरी यांचे काका दिनकर चौधरी आणि रत्नाकर चौधरी हे सध्या नांदेडला वास्तव्याला आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.