नांदेडच्या महापौर मोहिनी येवनकर यांचा राजीनामा;नव्या महापौर पदाच्या निवडीकडे सर्वांचे लक्ष..

1,082

नांदेड –

नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका,नांदेडच्या महापौर मोहिनी येवनकर यांनी महापौर पदाचा राजीनामा दिला आहे.त्यामुळे आता पुढील महापौर कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.दरम्यान महापौर पदाच्या शर्यतीत जयश्री पावडे यांचे नाव आघाडीवर असून तशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेत काँग्रेसचे बहुमत आहे.त्यानुसार सव्वा वर्षाचा कार्यकाळ याप्रमाणे महापौर पदाचे गणित ठरले असून सन 2017 पासून ते आजतागायत राजीनामा देणाऱ्या काँग्रेसच्या मोहिनी येवनकर या तिसऱ्या महापौर ठरल्या असून यापूर्वी शीला भवरे, दीक्षा धबाले आणि यानंतर आज गुरूवार दि. 30 सप्टेंबर रोजी मोहिनी येवनकर यांनी आपल्या महापौर पदाचा राजीनामा दिला आहे.

सव्वा-सव्वा वर्षे एकास संधी या समीकरणानुसार मोहिनी येवनकर यांच्या गळ्यात दि. 22 सप्टेंबर 2020 रोजी महापौर पदाची माळ पडली होती. एक वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू झाली आणि आज दि. 30 सप्टें रोजी मोहिनी येवनकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा मनपा आयुक्त यांच्याकडे सुपूर्द केला.

पुढील नवीन महापौर कोण होणार याकडे लागल्या सर्वांच्या नजरा..

नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या महापौर पदाचा मोहिनी येवनकर यांनी राजीनामा दिल्यानंतर पुढील नवीन महापौर कोण होणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या असून या शर्यतीत जयश्री पावडे यांचे नाव आघाडीवर असले तरी पालकमंत्री अशोक चव्हाण यांची नवीन महापौर निवडीबाबत भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. ऐनवेळी पालकमंत्री चव्हाण कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. त्यामुळे जयश्री पावडे यांच्यासह इतर इच्छुकही महापौर पदासाठी दावेदार करू शकतात. त्यामुळे महापौर पदाच्या निवडीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.नवीन महापौर पदाच्या निवडीचा कार्यक्रम पुढील आठवड्यात लागण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे..

Leave A Reply

Your email address will not be published.