नांदेडच्या ‘सिडको-हडको’ परिसरातील व्यापाऱ्यांकडून ‘बंद’ला संमिश्र प्रतिसाद.

298

नांदेड –

उतर प्रदेशातील लखीमपूर येथील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने ११ ऑक्टोबर रोजी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला नांदेडच्या ‘सिडको-हडको’ भागातील व्यापारी बांधवांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे.

उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथील दुर्घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने ११ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच शिवसेना अर्थातच महाविकास आघाडीच्या सक्रिय पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या महाराष्ट्र बंदच्या आवाहनाला नवीन नांदेड परिसरातील व्यापारी बांधवांच्या वतीने कुठे संमिश्र, तर कुठे अत्यल्प प्रतिसाद मिळाला आहे.

प्रारंभी, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना अर्थात महाविकास आघाडीचे पदाधिकारी व त्यांचे असंख्य सहकारी कार्यकर्त्यांनी सोमवारी सकाळी साडेदहा वाजेच्या दरम्यान, हडको येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्रपणे अभिवादन केले. त्याचवेळी, महाविकास आघाडीच्या असंख्य पदाधिकाऱ्यांनी लखीमपूर येथील शेतकऱ्यांच्या आंदोलना दरम्यान, ‘भाजप’च्या मंत्रीपुत्राने भरधाव वाहनाने चिरडून चार शेतकऱ्यांना ठार केलेल्या दुर्घटनेचा निषेध नोंदवून दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.तदनंतर काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना अर्थात महाविकास आघाडीचे पदाधिकारी व त्यांचे सहकारी कार्यकर्ते ‘हडको’तील मुख्य रस्त्याने ‘सिडको’च्या बाजारपेठेतून मोदी सरकारच्या विरूध्द घोषणा देत रॅली काढली. या पदयात्रेत अनुक्रमे काँग्रेसचे प्रवक्ते संतोष पांडागळे तसेच नांदेड-वाघाळा शहर ‘मनपा’चे माजी विरोधी पक्षनेते जीवन घोगरे पाटील यांच्यासह त्यांचे ‘महाविकास’ आघाडीचे सहकारी-पदाधिकारी तथा शिवसेना शहरप्रमुख निवृत्ती जिंकलवाड, साहेबराव मामिलवाड, सूर्यकांत गायकवाड, प्रमोद मैड, ‘वाघाळा’ ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विनोद कांचनगिरे, नांदेड (दक्षिण) अल्पसंख्याक विभागाचे प्रमुख शेख असलम, माजी नगरसेविका डॉ.करूणा जमदाडे, प्रा.डॉ. ललिता शिंदे- बोकारे, माजी नगरसेवक प्रा.अशोक मोरे, डॉ. नरेश रायेवार, डॉ. अशोक कलंत्री, डॉ. बी. एस. ढगे, प्रा. डॉ. रमेश नांदेडकर, श्यामसुंदर जाधव, प्रमोद मैड, शाहीर गौतम पवार, राजू लांडगे, शेख मोईन लाठकर, बापूसाहेब पाटील, संजय कदम, नामदेव पदमणे, प्रा. शशिकांत हाटकर, प्रसेनजित वाघमारे, एस. पी. कुंभारे, शंकरराव धिरडीकर, विजया काचावार, कान्होपात्रा पावडे, भारतीबाई रणवीर, अनिता गजेवार, शशिकला होनगुंडे, वनिता लोखंडे, विमलताई चित्ते, कविता चौहान, अनुसया शिंदे, अनिता गज्जेवार, देविदास कदम, वामनराव देवसरकर, प्रा. गजानन मोरे, भीमराव जमदाडे, भी. ना. गायकवाड, निवृत्ती कांबळे, राघोजी जोगदंड, भगवान जोगदंड, भूजंग जाधव, गणेश कंधारे, कृष्णा पांचाळ, दीपक देशपांडे, नारायण झडते, आनंदराव गायकवाड तसेच त्यांचे सहकारी-पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी होते. या पदयात्रेत सहभागी झालेले ‘महाविकास’ आघाडीचे पदाधिकारी व त्यांचे सहकारी कार्यकर्त्यांनी सिडकोच्या प्रमुख बाजारपेठेतील व्यापारी बांधवाना दुकाने तथा आपली प्रतिष्ठाणे बंद ठेवून महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. या आवाहनानंतर काही व्यापारी बांधवानी आपली दुकाने थोड्या वेळासाठीच का होईना बंद करून ‘महाराष्ट्र’ बंदला प्रतिसाद दिला आहे.

दरम्यान, रमामाता आंबेडकर चौकात मोदी सरकारचा निषेध व्यक्त करून महाविकास आघाडीच्या वतीने महाराष्ट्र बंदचा दुपारी सव्वा बाराच्या दरम्यान, समारोप करण्यात आला. या बंदनिमित्त काढण्यात आलेल्या पदयात्रेच्या दरम्यान, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड आणि सपोनि. सुरेश थोरात यांच्यासह पोउपनि. आनंद बिचेवार, पोलीस हेडकॉन्स्टेबल बालाजी लाडेकर, पोलीस नाईक तानाजी चाटे, दिलीप चक्रधर, सुरेश कांबळे, मोहन झुंजारे, माधव गिते तसेच त्यांचे सर्व सहकारी पोलीस कर्मचारी आणि गृहरक्षक दलाचे जवानांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.