नांदेडच्या हडको येथे शर्टाने गळफास घेवून तरूणाची राहत्या घरी आत्महत्या.

2,103

नांदेड-
दारूच्या नशेत राहत्या घरात छताच्या पंख्याला शर्टाने गळफास घेऊन एका ३० वर्षीय तरूणाने आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना २८ ऑगस्ट रोजी सकाळी सात वाजण्याच्या पूर्वी नांदेडच्या हडको परिसरात घडली.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार, नांदेडच्या सिडको वसाहती अंतर्गत असलेल्या एनडी-४२, पी-१, हडको परिसरातील रहिवासी तथा नांदेडच्या शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयातील कर्मचारी प्रविण रामराव खंदारे यांनी २८ ऑगस्ट रोजी सकाळी सात वाजण्यापूर्वी राहत्या घरी छताखालील पंख्याला शर्टाने गळफास घेवून आत्महत्या केली आहे.

महत्वपूर्ण बाब म्हणजे प्रविण खंदारे यांच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसले तरीही त्यांचा मोठा भाऊ प्रफुल्ल रामराव खंदारे यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे प्रविण खंदारे हे दारूच्या नशेत गळफास घेवून आत्महत्या केले असल्याची माहिती पोलीस ठाणे अंमलदार प्रविण केंद्रे व मदतनीस पो. कॉ. जनार्धन महाले यांनी दिली.
याप्रकरणी प्रफुल्ल रामराव खंदारे (रा. यशोधरा नगर, सिडको, नांदेड) यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे नांदेड ग्रामीण ठाण्यात आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल शेषेराव शिंदे मांजरमकर हे या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.