नांदेडमद्धे खाजगी कोचिंग क्लासेसची मुजोरी, विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू; जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपली !

शहरातील नामांकीत कोचिंग क्लासेस चालकांसह अनेकांना दंड

1,337
नांदेड –
नांदेड शहरात कोचिंग क्लासेस चालकांकडून सर्रास कोरोना नियमांची पायमल्ली करण्यात येत आहे. शहरातील खाजगी कोचिंग क्लासेस यांनी प्रशासनाचे आदेशही चक्क झुगारले आहेत. हजारो विद्यार्थ्यांकडून मिळणारी करोडो रुपयांची फी वसुली बुडू नये, यासाठी काही कोचिंग क्लासेसचे चालक विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळत असल्याचे धक्कादायक चित्र नांदेडमध्ये दिसून आले आहे. सर्वाधिक गंभीर बाब म्हणजे राष्ट्रीय पातळीवरील स्वयंघोषित टॉपर असणाऱ्या कोचिंग क्लासेस चालकांचाही यात समावेश आहे.

जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी जिल्ह्यासाठी नवीन कोरोना नियमावली जाहीर केली असून गुरुवारी दि. 13 जानेवारी रोजी कोरोना नियमावलीचे उल्लंघन केल्यामुळे जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने शहरातील आर.सी.सी कोचिंग क्लासेसला 50 हजार रुपये, सलगरे कोचिंग क्लासेसला 10 हजार रुपये यासह इतरही काही कोचिंग क्लासेस चालकांकडून कोरोना नियमावलीचे उल्लंघन केल्यामुळे 95 हजार रुपये दंड वसुल करण्यात आला आहे.
मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली व अतिरिक्त आयुक्त बाबासाहेब मनोहरे, अतिरिक्त आयुक्त गिरिष कदम यांच्या नियंत्रणाखाली उपायुक्त अजितपालसिंघ संधु, क्षेत्रीय अधिकारी एक ते सहाचे संजय जाधव, डॉ. मिर्झा फरतुल्लाह बेग, रमेश चवरे, डॉ. रईसोद्दीन, रावण सोनसळे, अनिवाश अटकोरे व सहा. आयुक्त सुधीर इंगोले यांच्या पथकाने या कारवाईत सहभाग नोंदविला.

Leave A Reply

Your email address will not be published.