नांदेडमद्धे ४८ वी अखिल भारतीय श्री गुरु गोबिंदसिंघजी गोल्ड ॲन्ड सिल्वर कप राष्ट्रीय हॉकी स्पर्धेचे ३ जानेवारी पासून आयोजन

नामवंत १६ राष्ट्रीय हॉकी संघांना स्पर्धेचे निमंत्रण

331
नांदेड –
देश पातळीवर नावाजलेली आणि गेल्या पन्नास वर्षांपासून राष्ट्रीय खेळ हॉकीची क्रीडाज्योत तेवत ठेवणारी नांदेडची सुप्रसिद्ध ४८ वी अखिल भारतीय श्री गुरु गोबिंदसिंघजी गोल्ड ॲन्ड सिल्वर कप राष्ट्रीय हॉकी स्पर्धा ४८ वी अखिल भारतीय श्री गुरु गोबिंदसिंघजी गोल्ड ॲन्ड सिल्वर कप राष्ट्रीय हॉकी स्पर्धा नांदेड येथे येत्या दि. ३ जानेवारी ते ९ जानेवारी २०२२ दरम्यान दुष्टदमन क्रीडा युवक मंडळ हॉकी, नांदेड तर्फे आयोजित करण्यात येत असल्याची माहिती क्रीडा मंडळाचे सचिव हरविंदरसिंघ कपूर यांनी दिली.

नांदेड शहरात दरवर्षी शीख धर्माचे दहावे गुरु, श्री गुरु गोबिंदसिंघजी महाराज यांच्या जन्मोत्सवाला समर्पित अखिल भारतीय श्री गुरु गोबिंदसिंघजी गोल्ड ॲन्ड सिल्वर हॉकी स्पर्धा घेतली जाते. त्यानुसार यंदा ४८ वी स्पर्धा घेतली जात आहे. या स्पर्धेत यावर्षी विविध राज्यांच्या सोळा राष्ट्रीय संघांना निमंत्रण पाठविण्यात आलेले आहे. यात पंजाब, हरियाणा, गुजरात, कर्नाटक, तेलंगाना, मध्यप्रदेश व इतर राज्यांचे राष्ट्रीय संघ सहभागी होण्याची शक्यता आहे. येत्या दि. ३ जानेवारी रोजी हॉकी इंडियाच्या राष्ट्रीय नियमावली प्रमाणे खालसा हायस्कूल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मिनी स्टेडियम मैदानावर हॉकी स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. सुरुवातीला लीग प्रणालीने सामने होतील. लीग प्रणालीने गुणतालिकेच्या मागणीनुसार पुढील सामने नॉकऑउट प्रणालीने होतील. या स्पर्धेची जय्यत तयारी केली जात आहे.
या स्पर्धेच्या तयारीसाठी दुष्टदमन क्रीडा व युवक मंडळाचे अध्यक्ष तथा नगरसेवक गुरमीतसिंघ नवाब, जितेन्द्रसिंघ खैरा, जसपालसिंघ काहलो, संदीपसिंघ अखबारवाले, महेन्दरसिंघ लांगरी, हरप्रीतसिंघ लांगरी, महेन्द्रसिंघ गाडीवाले, अमरदीपसिंघ महाजन, विजयकुमार नंदे, जसबीरसिंघ चीमा हे परिश्रम घेत आहेत, अशी माहिती सचिव हरविंदरसिंघ कपूर यांनी दिली. स्पर्धेतील प्रथम विजेता संघाला एक लाखाचे बक्षीस आणि फिरता चषक तर दुसऱ्या क्रमांकाच्या विजेत्या संघाला दहा हजाराने वाढ करून ५१ हजारांचे बक्षीस आणि चषक दिला जाणार आहे. तसेच खेळाडूंसाठी इतर वैयक्तिक परितोषिके दिली जातील, असेही त्यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.