नांदेड ग्रामीण पोलिसांची जबरदस्त कामगिरी; घरफोडीतील मुद्देमाल केला फिर्यादीस परत.

477
गंगाधर पडवळे,
भोकर / नांदेड –
ग्रामीण पोलीस ठाणे, नांदेड अंतर्गत घरफोडीतील गुन्ह्याच्या आरोपीस जेरबंद करून अवघ्या सहा महिन्यांत मा. न्यायालयाच्या आदेशानुसार मुद्देमाल फिर्यादीस परत केल्यामुळे ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्यासह टीमचे पोलीस अधीक्षक, पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी यांच्यासह सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
पोलीस ठाणे ग्रामीण नांदेडच्या हद्दीत दि.१४/ ०३/२०२० फिर्यादी गुलाम मोहसीन अब्दुल हमीद, वय ५०, व्यवसाय नौकरी राहणार रौफ कॉलनी, निजामपेठ, धनेगाव ता.जि.नांदेड नामक व्यक्तीने दिलेल्या फिर्यादीवरून गुरनं १४३/२०२० कलम ४५४,३८० भादंवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदरील गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली एम.डी. हंबर्डे पोलीस उपनिरीक्षक यांनी केला. सदर गुन्ह्याच्या तपासात पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्यासह गुन्हे शोध पथकातील व तपास पथकातील सहपोलिस निरीक्षक संकेत दिघे,पोलीस अमलदार पो.ना.प्रमोद कऱ्हाळे, संतोष जाधव, ज्ञानोबा कवठेकर, प्रभाकर मलदोडे, पो. ना. मामुलवार, पो. का. विश्वनाथ पवार,चंद्रकांत स्वामी,शिवानंद कानगुले, वाहन चालक सुरेश पुरी,राजू हुमानाबादे या चमूने या गुन्ह्यातील वास्तववादी व तांत्रिक पुरावे शोधून, उपलब्ध करून आरोपींचा शोध लावला असता आरोपी सय्यद हमीद सय्यद महेबूब अली, वय ४१, रा.पुणे शहर ह.मु. खडकपुरा ता.जि.नांदेड यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याचा सहभाग असल्याचे दिसताच त्यास अटक करून दि.२६/९/२०२१ अधिक तपास केला असता तपासात आरोपी अतिसाहसी असल्याचे दिसून आल्याने त्याच्याकडे बारकाईने तपास केला असता दोन सोन्याच्या चैन, बाजार किंमत अंदाजे ८० हजार रुपये त्याच्या कडून जप्त करण्यात आल्या.सदरील गुन्ह्यातील मुद्देमाल मा. न्यायालयाच्या आदेशानुसार फिर्यादी गुलाम मोहसीन अब्दुल हमीद रा.रौफ कॉलनी धनेगाव यांना परत करण्यात आला.
गुप्त बातमीदारा मार्फ़त माहिती काढून प्रत्येक अधिकारी, कर्मचारी यांनी आपले लकब, कौशल्य वापरून सदर गुन्ह्यातील आरोपींची माहिती काढून गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न करून गुन्हा उघडकीस आणणे ही बाब खूप अवघड व तितकीच जिकरीचे असते,असे काम करण्यात पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड हे सुपरिचित आहेत. या आधीही असे अनेक उल्लेखनीय कामे त्यांनी केले असून त्यामुळेच त्यांनी पोलीस खात्याचा विश्वास मिळविला आहे. सदर उल्लेखनीय कामगिरीवर नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे,अप्पर पोलीस अधीक्षक नांदेड निलेश मोरे,अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे भोकर, सिद्धेश्वर भोरे उपविभागीय पोलीस अधिकारी इतवारा आदींनी त्यांच्या टीमचे विशेष अभिनंदन केले. या कामगिरी मुळे जिल्ह्यात सर्व स्तरातून सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.