नांदेड जिल्हा हिवताप व हत्तीरोग कर्मचारी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सभा ऑनलाईन संपन्न.

483

नांदेड –

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता व सहकार आयुक्त पुणे यांच्या मार्गदर्शनानुसार वार्षिक सभा ऑनलाईन पध्दतीने घेण्याबाबत सुचित केल्यानुसार सर्व सभासद बांधवांना त्यांच्या वैयक्तिक व्हाट्सअप नंबरवर ऑनलाईन लिंक पाठवून आज दि.११ सप्टेंबर २०२१ रोजी महाराष्ट्र राज्य हिवताप कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित नांदेड अंतर्गत कर्मचारी यांची झुम अँपद्वारे ऑनलाईन सभा पतसंस्थेच्या कार्यालयात संचालक मंडळ यांच्या उपस्थित घेण्यात आली. संस्थेचे चेअरमन सुभाष कल्याणकर यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन सभा घेण्यात आली.वार्षिक सर्वसाधारण सभेचे विषय सुचीवरील विषय मांडण्यात आले. दीर्घ मुदती कर्ज मर्यादा रु.७ लाख वरून रू.१० लाख करणे, रिर्झव्ह फंड मधील रक्कम वळती करून पतसंस्थेस फ्लॅट, ईमारत घेणे, विमा लागू करणे या बाबत सभासद बांधवांनी उत्तम प्रतिसाद दिला. सन २०२०-२१ या वर्षात नफ्यामध्ये वाढ झाल्याने मागील वर्षा पेक्षा ६ टक्के वरुन १ टक्के वाढ करण्यात आली. ७ व १० टक्के प्रमाणे लाभांश कर्मचारी यांच्या नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा नवीन मोंढा नांदेड येथील खात्यावर लवकरच जमा करण्यात येणार आहे.

सर्व सभासद बांधवांना विमा लवकरात लवकर लागू करण्यात यावा अशी सभासद बांधवांनी मागणी केली. येत्या काही दिवसात सर्व सभासद बांधवाचा विमा करण्यात येणार आहे सभासद बाधवांची माहिती संबंधित कार्यालयाकडून अप्राप्त आहे अशी माहिती कल्याणकर यांनी दिली.

यावेळी सत्यजीत टिप्रेसवार सचिव, अशोक ढवळे व्हा.चेअरमन,चंद्रभान धोंडगे पंच, संजय भोसले, बालाजी आळणे संचालक, कैलास मोरे लिपिक, गजानन कदम, श्रीमती वानखेडे उपस्थित होते.मोहन पेंढारे, माणिक गिते, देविदास भुरेवार, प्रदिप गोधने, मनोहर खानसोळे, राजकुमार ढवळे, संचालक हे ऑनलाईन होते. सभासद बांधवांनी ऑनलाईन सहभाग नोंदविला बद्दल पतसंस्थेच्या वतीने सचिव सत्यजीत टिप्रेसवार यांनी आभार मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.