नांदेड येथे ५ डिसेंबर रविवार रोजी पद्मशाली समाजाचे राज्यस्तरीय उपवधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन.

296
नांदेड –
मराठवाडा पद्मशाली युवक संघटनेच्या वतीने दि. ५ डिसेंबर २०२१ रोज रविवार सकाळी ठीक १० वाजता कै.भुदेवी किशनशेठ गोरंट्याल सभागृह, मातोश्री मंगल कार्यालय, नवीन कौठा, नांदेड येथे पद्मशाली समाजाचा राज्यस्तरीय उपवधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यास उद्घाटक म्हणून महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री आपल्या सर्वांचे लाडके नेते माननीय नामदार अशोकराव चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.

या मेळाव्याचे मुख्य आकर्षण म्हणजे या मेळाव्यात असंख्य कार्यकर्त्यांनी संकलीत केलेल्या शेकडो उपवधू-वरांची नाव नोंदणी व जाहिराती असलेली स्मरणिका ” स्नेहबंध “ चे प्रकाशनही होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अखिल भारत पद्मशाली संघम हैदराबादचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीधरराव सुंकरवार, विशेष अतिथी म्हणून पद्मशाली समाजाचे खासदार डॉ.संजीवकुमार सिनगेरी, हिंगोली लोकसभा मतदार संघाचे खासदार हेमंतभाऊ पाटील, अखिल भारत पद्मशाली संघम हैदराबादचे उपाध्यक्ष तथा प्रसिद्ध उद्योगपती गोपालसेठ गोरंटयाल, मराठवाडा पद्मशाली महासभेचे अध्यक्ष डॉ. मारोतराव क्यातमवार व प्रमुख पाहुणे म्हणून जालनाचे आमदार कैलाससेठ गोरंट्याल, विधान परिषदेचे आमदार अमरभाऊ राजूरकर, नांदेड दक्षिणचे आमदार मोहन अण्णा हंबर्डे, नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर, माजी आमदार डी. पी. सावंत, मा.आ.ओमप्रकाश पोकर्णा, नांदेड मनपाच्या महापौर सौ. जयश्री ताई पावडे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. मंगाराणी अंबुलगेकर, पद्मशाली समाजाच्या जालनाच्या नगराध्यक्षा सौ.संगीताताई गोरंट्याल, किनवटचे नगराध्यक्ष आनंद मच्चेवार, कुंडलवाडीच्या नगराध्यक्षा सौ. सुरेखाताई जिठ्ठावार, पद्मशाली समाजाचे प्रौढ जिल्हाध्यक्ष माधव अण्णा साठे, वसमत नगर परिषदेचे उपाध्यक्ष सीताराम म्यानेवार, नांदेड महानगरपालिकाचे नगरसेवक राजेश यन्नम, नागेश कोकुलवार, नागनाथ गड्डम, शिवसेनेचे प्रकाश मारावार, वसमतचे मा.नगराध्यक्ष शिवदास बोडेवार, प्रसिद्ध उद्योजक विजय भंडारे हैद्राबाद, रामचंद्र आडेपवार पुणे, अशोक इंदापुरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या परिचय मेळाव्यास महाराष्ट्रासह तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक, छत्तीसगढ या राज्यातून पद्मशाली समाज बांधव येणार आहेत. तरी तमाम पद्मशाली समाज बांधवांनी सहकुटुंब सहपरिवारासह व व्यावसायिक बंधूनी या दिवशी आपले उद्योग व्यवसाय बंद ठेवून पद्ममशाली समाजाच्या राज्यस्तरीय परिचय मेळाव्यात सहभागी व्हावे. तसेच मेळाव्यात नोंदणी केलेल्या व न केलेल्या अशा सर्व उप वधुवरांनी आपल्या पालकांसह मोठ्या संख्येने उपस्थित राहून मेळावा स्थळी नोंदणी करून सोहळा यशस्वी करावा असे आवाहन मराठवाडा पद्ममशाली युवक संघटनेचे अध्यक्ष गोविंद तुळशीराम कोकुलवार, कार्याध्यक्ष शिवाजी अन्नमवार, सचिव सत्यजीत टिप्रेसवार व सर्व पदाधिकारी मराठवाडा पद्ममशाली युवक संघटना आणि नांदेड जिल्हा पद्मशाली युवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संग्राम निलपत्रेवार यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.