नानक साई फाऊंडेशनच्या घुमान यात्रेची जय्यत तयारी;विमानाने जाणार घुमान वारी.

204

नांदेड-
संत नामदेव महाराज यांच्या जन्म-शताब्दी वर्षाच्या औचित्याने नानक साई फाऊंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात येत असलेल्या घुमान यात्रेची जय्यत तयारी सुरू झाली असून यावेळी घुमान वारी विमानाने प्रवास करण्याचे नियोजन केले जात आहे.

संत नामदेवाची सातशे एकावणवे जन्म – शताब्दी वर्ष आहे. यावेळी घुमान यात्रेन कात टाकली आहे, यात्रा हवाई मार्गानं घुमानला जाणार आहे.भक्तीची एक नितळ वाट माणसाच्या मनात धोपटं करून भक्तीरसात अक्षरशः भिजवते.धकाधकीच्या जीवनात हरवत चाललेलं समाधानाच धन यातून मिळतं.. महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यातून भक्त आपली हजेरी लावतात,आनंदाचा अनुपम सोहळा अनुभवत असतात. सातवी घुमान यात्रा यासाठी महत्वाची आहे की,संत नामदेवाची सातशे एकावण जन्म – शताब्दी वर्ष आहे.. कोरोनाला हरवून आम्ही हवाई प्रवास करून घुमानवारी यशस्वी करू असा दृढ – निश्चय नानक-साई फाऊंडेशनचे चेअरमन पंढरीनाथ बोकारे यांनी व्यक्त केला आहे.. यावेळी संत नामदेव महाराजांच्या जन्म -शताब्दी वर्षाचा संदर्भ असल्या कारणाने घुमानवारीला वेगळे ऐतिहासिक महत्त्व आहे.पंजाब सरकारच्या माध्यमाने मोठ्या उत्सवाची पुर्वतयारी सुरू आहे. घुमान हरगोविंदपूरचे आमदार सरदार बलविंदरसिंघ लाड्डी यांनी यात्रा समितीचे स्वागताध्यक्ष पद स्वीकारले आहे. त्या उत्सवात हुजूर – साहेब नांदेडहून घुमानवारी म्हणजे दुग्ध शर्कर योगच जुळून आला आहे. नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात (16 नोव्हेंबर) यात्रा आयोजित करण्याची लगबग सुरु आहे.. यात्रेसाठी जवळपास 110 जणांनी नाव नोंदणी केली आहे. यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
संत नामदेव महाराज यांची कर्मभूमी ‘तीर्थक्षेत्र घुमान’ – ‘सुवर्ण मंदिर’ अमृतसर – शक्ती पीठ ‘माता नैना देवी’ (हिमाचल प्रदेश) – ‘आनंदपूर साहिब’ (तख्त) – आशिया खंडातील सर्वात उंच आणि भव्य ‘भाकरा नांगल’ धरण – पंजाबच्या संस्कृतीचा अंखो देखा इतिहास असलेले ‘विरास्ते ‘खालसा म्युजियम’ आनंदपूर साहिब – जालंधर – सुल्तानपूर लोहडी- परजिया कलान-‘कार्तिकी स्वामी’ – वाघा ‘अटारी’ बॉर्डर – ‘माता दुर्गा’ मंदिर अमृतसर – ‘जालियनवाला’ बाग – अमृतसर हवाई अड्डा – असे भ्रमण व दर्शन घडवून यात्रा नांदेडच्या श्री गुरू गोबिंद सिंघजी विमानतळावर परतीचा प्रवास करणार आहे..

Leave A Reply

Your email address will not be published.