नायगावातील बरबडाच्या ग्रामसेवकांने 14 व्या वित्त आयोगाच्या निधीतून केलेल्या कामाच्या चौकशीसाठी आमरण उपोषण.

1,050

नांदेड –

नायगाव तालुक्यातील बरबडा येथील तत्कालीन ग्रामसेवक रवी नव्हारे यांनी १४ व्या वित्त आयोगाच्या निधीत केलेल्या कामाची चौकशी करण्याच्या मागणीसाठी मनोहर ढुमणे व सुनिल बाभुळगांवकर हे नांदेड जिल्हा परिषदेच्या समोर दि. 4 आक्टोबर पासून आमरण उपोषणास बसले असून चौकशी झाल्याशिवाय माघार घेणार नसल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.

नायगाव तालुक्यातील बरबडा येथील तत्कालीन ग्रामसेवक रवि नव्हारे यांच्या कार्यकाळातील १४ व्या वित्त आयोग प्राप्त निधीतील निकृष्ट व बोगस कामाची चौकशी करावी तसेच जनरल खात्यातील कर वसुलीमधील अपहार केलेल्या खात्यावरील रकमेची चौकशी करुन दोषीवर तात्काळ कार्यवाही करावी अन्यथा आपल्या कार्यालयासमोर दि. ०४.१०.२०२१ रोजी आमरण उपोषणास बसणार असल्याचे निवेदन मनोहर ढुमणे व सुनिल बाभुळगांवकर यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दि.१५.०९.२०२१ दिले होते. मात्र जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी तब्बल विस दिवसानंतरही दिलेल्या निवेदनाची दखल घेतली नाही. झालेल्या अपहाराची तर दखल नाहीच पण दिलेल्या तक्रारीला जिल्हा परिषदेने काहीही उत्तर दिले नसल्याने भ्रष्टाचार करणाऱ्यांना पाठीशी घालण्याची जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांची भूमिका असल्याचे तक्रारदारांचे मत झाले. त्यामुळे आज दि. ०४.१०.२०२१ रोजी उपोषण कर्ते जिल्हा परिषदेच्या समोर आमरण उपोषणास बसले आहेत. वास्तविक सध्या पावसाचे दिवस असल्याने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या निवेदनाची दखल घेवून तक्रारदारांच्या तक्रारी बाबत नायगाव पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाच्या अधिकाऱ्यांना आदेशीत करणे आवश्यक होते पण तसे न झाल्याने मनोहर ढुमणे व सुनिल बाभुळगांवकर हे आमरण उपोषणास बसले आहेत. ग्रामसेवक रवि नव्हारे यांचा कार्यकाळ अंदाजीत ५ वर्ष असून बरबडा गांव हे ६००० लोकसंख्येचे असून सदर गावाच्या पायाभुत विकास कामासाठी शासन दरडोई निधी थेट ग्राम पंचायत बँक खात्यावर जमा करीत असल्यामुळे संबंधीत ग्रामसेवक व सरपंच यांच्या संगनमताने विकास निधीतून रक्कम थेट कामावर खर्च न करता कागदोपत्री कामे करणाऱ्या भोंगळ कारभाराची चौकशी करण्यासाठी उच्च पदस्थ अधिकारी याची नेमणुक करुन चौकशी करावी व चौकशी अहवाला अंती दोषींवर कार्यवाही करावी अशी मागणी असून चौकशी झाल्याशिवाय माघार घेणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान मनोहर ढुमणे व सुनिल बाभुळगांवकर यांनी सदरच्या मागणीचे निवेदन नायगाव पंचायत समितीला दिले नाही व जिल्हा परिषदेनेही नायगाव पंचायत समितीला कळवले नाही. त्यामुळे सदरच्या तक्रारीबाबत नायगाव पंचायत समिती अनभिज्ञ होती पण सोमवारी सायंकाळी ही बाब कळल्यानंतर विस्तार अधिकारी शेख लतीफ व एस.आर. का़बळे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेवून मन वळवण्याचा प्रयत्न केला असता चौकशी झाल्याशिवाय माघार घेणार नसल्याचे सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.