नायगावातील सुजलेगाव येथे अल्पवयीन मुलीचा विनयभंग; वीस वर्षीय आरोपीवर गुन्हा दाखल

800
नायगाव, नांदेड –
नायगाव तालुक्यातील सुजलेगाव येथील व कुंटुर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सुजलेगाव येथील एका अल्पवयीन मुलीवर विनयभंग केल्यामुळे सुजलेगाव येथील आरोपी स्वदेश गणपत वाघमारे, रा. सुजलेगाव, वय वर्ष  20, याच्यावर 376 प्रमाणे 4,6 पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सुजलेगाव येथील सामान्य कुटुंबातील दोन्ही मुलं व मुलगी प्रेमसंबंध असल्याची माहिती होती.गेल्या सहा महिन्यापासून मुलगा व मुलगी एकमेकांना पसंत करून लग्न करण्याच्या आणाभाका घेतल्या होत्या अशी गावातील व परिसरातील नागरिकांत चर्चा सुरू होती. मात्र काही दिवसापूर्वी दोघांना घरच्यांनी बोलत असताना पकडून एकमेकांना तंबी दिली व माहिती सांगून हे चुकीचे असे सांगितले असताना सुद्धा प्रेमामध्ये गुंग झालेल्या या प्रेमी युगुलांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला असता लगेच दिनांक 10/ 12 /2021 रोजी संध्याकाळी अंदाजे आठ वाजता दोघांनाही पकडून पोलीस स्टेशनला हजर केले असता मुलाने मला फुस लावून माझा विनयभंग गेल्याची माहिती अल्पवयीन मुलीने पोलीस स्टेशनला दिल्या नंतर सदर आरोपी स्वदेश गणपत वाघमारे यांच्यावर 376 प्रमाणे पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे .
आरोपी मुलास चार दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे व मुलीचे  वय कमी असल्याने महिला बाल सुधारगृहात पाठवल्याची माहिती प्रकाश वीरभद्र तांबोळी यांनी दिली असून प्रेमात प्रेमसंबंध होऊन सहा महिने एकमेकांना पसंत करून लग्नाच्या आणाभाका घेतल्या आणि समाजात एक वेगळे वातावरण निर्माण होईल म्हणून आई-वडिलांनी समजून सांगितल्यानंतर ही ऐकत नसल्याने या मुलावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मुलगा व मुलीच्या घरच्याकडून देण्यात आली आहे. पुढील तपास कुंटूरचे सहायक पोलीस निरीक्षक महादेव पुरी हे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.