नायगावात डॉ.वडजे यांच्या खाजगी दवाखान्यात गरोदर मातेसाठी दर्जेदार उपचार.

महिला रुग्णासाठी वडजे हॉस्पिटल ठरले संजीवनी.

522

नायगाव, नांदेड –

ग्रामीण भागात शासकीय आरोग्य विभाग रुग्णासाठी दवाखान्यात दर्जेदार सोयी सुविधा देत असल्याचे सांगत असले तरी प्रत्यक्षात सुविधा मिळत नसल्यामुळे नायगावात डॉ.जी.जी.वडजे यांच्या खाजगी दवाखान्यात गरोदर मातेसाठी चांगल्या प्रकारे उपचार मिळत असल्यामुळे रुग्णालयातील महिला रुग्ण समाधान व्यक्त करीत असल्याचे अनेक महिला व रुग्णाच्या नातेवाईकाने सांगितले आहे. सदरच्या खाजगी दवाखान्यात मोठया प्रमाणात स्वच्छता ठेवली जाते व एका तासात दोन वेळा साफ सफाई केली जात असल्यामुळे महिला रुग्णाचे आरोग्य टवटवीत असल्याचे रुग्णालयातील महिला रुग्णांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले आहे.

नायगाव तालुक्यासह ग्रामीण भागातील डिलिव्हरीसाठी कहाळा खु.येथील रहिवासी डॉ.जी.जी.वडजे यांच्या खाजगी दवाखान्यात महिला गरोदर माता उपचार चांगल्या प्रकारे होत असल्यामुळे दाखल होताना दिसून येत असून या खाजगी दवाखान्यातील सिस्टर व मावशी कर्मचारी चांगल्या प्रकारे काम करत असल्याने उपचार सुरळीत मिळत असल्यामुळे गरोदर मातेसाठी हे रुग्णालय एक प्रकारचे संजीवनी ठरले असल्याचे जनतेतुन बोलल्या जात आहे. दवाखान्यात स्वच्छताग्रह, प्रसूतीग्रह, सोनोग्राफी, रक्त तपासणी अशा अनेक प्रकारच्या सोयी सुविधा राबविल्या जात असल्यामुळे महिला रुग्णाची पसंती डॉ.वडजे यांच्या खाजगी दवाखान्याकडे असल्याचे दिसून येत आहे.

तालुक्यातील कहाळा येथील रहिवासी असलेले डॉ.जी.जी.वडजे कहाळेकर हे एमबीबीएस, डीजीओ (मुबंई) स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र तज्ञ असून त्यांनी शहरात हा सुसज्ज दवाखाना न टाकता आपले ग्रामीण भागातील संबंध टिकवले आहेत. यामुळे सदरच्या दवाखान्यात महिला गरोदर रुग्णाची संख्या मोठया प्रमाणात दवाखान्यात दिसून येत असून यांच्या दवाखान्यात उपचार चांगल्या प्रकारे मिळत असल्यामुळे नांदेड ऐवजी नायगावातच महिला रुग्णाची संख्या वाढत असल्याचे पाहावयास मिळत असून खरे तर नायगावात डॉ.वडजे यांच्या खाजगी दवाखान्यात गरोदर मातेसाठी दर्जेदार उपचार होत असल्यामुळे रुग्णालयातील रुग्ण समाधान व्यक्त करीत असल्याचे दिसून आले.

Leave A Reply

Your email address will not be published.