नायगावात वीज पडून म्हैस दगावली.
नायगाव, नांदेड –
नायगाव तालुक्यात शेळगाव गौरी ता. नायगाव जि.नांदेड दत्तात्रय गंगाधर पांचाळ यांच्या शेतामध्ये आज दि. 22 सप्टेंबर रोजी 4.00 वा. वीज पडून म्हैस दगावली आहे.या घटनेमुळे शेळगाव येथील शेतकरी पांचाळ कुटुंबावर आभाळ कोसळले आहे.
नायगाव तालुक्यात गेल्या दोन दिवसापासून पावसाने हजेरी लावली असून हवामान खात्याच्या अंदाजा प्रमाणे पडत असलेला पाऊस वादळी वारे विजेच्या कडकडाटात झालेला पाऊस या मुळे प्रचंड प्रमाणात शेतीचे नुकसान होत असून,यातच नैसर्गिक आपत्तीने वीज पडून दगावलेली म्हैस यामुळे सध्या तरी शेतकरी वर्गात शेतात काम करताना भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.