नायगाव नगरपंचायतसाठी ११ जागांसाठी २७ उमेदवार रिंगणात; ८०९३ मतदार हक्क बजावणार
प्रशासन यंत्रणा सज्ज, पोलीस प्रशासनाचे पथ संचलन
नायगाव, नांदेड –
नायगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीत ११ जागेसाठी २७ उमेदवारांचे भवितव्य २१ डिसेंबर रोजी मतपेटीत बंद होणार असून एकूण ११ प्रभागात १३ ठिकाणी मतदान केंद्र उभारण्यात आले आहेत.तर एकूण ४१६७ पुरुष व ३९२५ स्त्री असे एकूण ४०९३ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. दि.२२ डिसेंबर रोजी निकाल लागणार होता पण नवीन धोरणा प्रमाणे निकाल लांबणीवर पडला असून मतदान प्रक्रियेसाठी महसूल व पोलीस प्रशासन यांनी पूर्ण तयारी केली असून पूर्ण यंत्रणा सज्ज असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सचिन गिरी व पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे यांच्या मार्गदर्शना खाली शहरातील मुख्य रस्त्यावर १०० च्या वर पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे सोमवारी सायंकाळी पथ संचलन करण्यात आले आहे..
नायगाव नगर पंचायत निवडणूकीत निवडणुकीपूर्वीच भाजपच्या तीन उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे काँग्रेसच्या गीताबाई नारायण जाधव, प्रभाग क्रमांक ९, सुमनबाई सोनकांबळे, प्रभाग क्रमांक ३ व माजी नगराध्यक्ष विजय भालेराव प्रभाग क्रमांक ८ मधून एकमेव अर्ज असल्याने त्यांना बिनविरोध घोषित करण्यासाठी निवडणूक आयोगाकडे प्रस्ताव पाठविल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. तर ओबीसी आरक्षण निर्णयाने प्रभाग ७,९,११ ची निवडणूक रद्द झाल्यामुळे या तीन व अविरोध तीन असे ६ प्रभागामध्ये निवडणूक होत नसून यामुळे १७ मधून ६ वगळले तर केवळ इतर ११ प्रभागांमध्ये निवडणुका पार पडत असून काँग्रेस पक्षातर्फे ११ उमेदवार भाजपतर्फे ११ तर शिवसेने तर्फे ३ उमेदवार तर प्रभाग १६ व १० मतदारसंघात २ अपक्ष असे एकूण २७ उमेदवार रिंगणात उतरले आहेत.
मतदार यादीत प्रचंड फेरबद्दल, कुटुंबातील मतदारांची फोडा फोड
नायगाव नगरपंचायत निवडणुकीत मतदार याद्यामध्ये प्रचंड फेरबद्दल व गोंधळ झाला असून काही ठिकाणी घर एका प्रभागात मतदान दुसऱ्या प्रभागात असे झाले आहे.तर पती एका प्रभागात तर पत्नी एका तर मुले,सुना दुसऱ्या प्रभागात असा ही प्रकार घडला आहे.यामुळे आज मतदान करताना मतदारांची दमछाक होणार आहे.